पोलिस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पोलिस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

नागपूर - वाडी पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्याविरुद्ध अखेर महिनाभराने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी त्यांनी यापूर्वीच सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. शेवटी रक्षकच भक्षक निघाल्याची चर्चा शहर पोलिस दलात आहे.

वर्षभरापूर्वी जाधव हे कामावर हजर असताना एका मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार घेऊन काही लोक पोलिस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार घेतली. तेव्हा फिर्यादीसोबत एक ३२ वर्षीय तरुणी मंजूषा (बदललेले नाव) हजर होती. तक्रार नोंदवून घेताना मंजूषाची ओळख जाधव यांच्याशी झाली. त्यांनी एकमेकांना आपापले मोबाईल क्रमांक दिले. त्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्‌सॲप वरून चॅटिंग सुरू झाले. त्यातून मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 

पीडित तरुणी अविवाहित असल्याने आईवडिलांसोबत राहायची. पण, पोलिस निरीक्षक जाधव याने तिला एमपीएससी परीक्षेत पास होण्याची हमी आणि नोकरी लावून देण्यासाठी ‘सेटिंग’ करण्याची तयारी दर्शविली. प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर ती ‘लिव्ह इन’मध्ये राहायला तयार झाली. त्यांनी अमरावती मार्गावर एका ठिकाणी खोली भाड्याने घेतली. पती-पत्नीसारखे राहू लागले. त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले.

आता त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वाडी पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने तरुणीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी उपायुक्त विवेक मासाळ यांना चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर एमआयडीसीच्या सहायक पोलिस आयुक्तांकडून चौकशी सुरू झाली. सहायक आयुक्तांनी जाधव यांना चौकशीसाठी बोलवले असता त्यांनी गुन्हा दाखल करून अटक होण्याची भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. त्याला न्यायालयाने जामीनही मंजूर केला. अखेर पोलिसांनी चौकशी पूर्ण करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यानंतर पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com