मित्राच्या पत्नीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नागपूर : एकाच कंपनीत नोकरीवर असलेल्या युवकाने मित्राच्या पत्नीला पतीची पेमेंट स्लिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला. ही घटना एमआयडीसी परीसरात उघडकीस आली. पत्नीच्या तक्रारीवरून पतीच्या मित्राविरूद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मोहम्मद ताहीर शेख (32, फारूख नगर, नवीन वस्ती,टेका) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 27 वर्षीय महिला माधुरी (बदललेले नाव) हिचे एमआयडीसीतील एका औषध बनविणाऱ्या कंपनीत नोकरीवर असलेल्या एका युवकाशी दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. कौटूंबिक कलहातून दोघांत बिघडले. त्यामुळे ती माहेरी राहायला गेली. तिला पतीपासून घटस्फोट घ्यायचा होता. न्यायालयीन प्रकरणासाठी पतीची "सॅलरी स्लिप' आणि नियुक्‍तीपत्राची झेरॉक्‍स मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला मिळवता आली नाही. त्यामुळे पतीसोबत नेहमी घरी येणारा मित्र मोहम्मद ताहीर याच्याशी माधुरीने संपर्क केला. त्याने तिला मदत करण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी दोघांच्या वारंवार भेटी होत गेल्या. 11 डिसेंबरला त्याने माधुरीला फिरायला नेले. जंगलात नेल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्याने पतीचे कागदपत्र न देण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजास्तव राजी झाली.
ताहीरने एमआयडीसीतील हॉटेल बूक केले. तेथे तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने सुरूवातीला मित्राची सॅलरी स्लिप मिळवून दिली. मात्र, नियुक्‍तीपत्रासाठी पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी केली. अशाप्रकारे दोघांचे संबंध वाढत गेले. आरोपीने माधुरीला लग्नाचे आमिष दाखवले. वारंवार होणाऱ्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून माधुरीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात मो. ताहीर विरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape on friends wife