दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर : दहाव्या वर्गात शिकत असणारी अल्पवयीन मुलगी आणि 20 वर्षांच्या युवकांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी सुखी जीवनाचे स्वप्न रंगवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे हे प्रेमप्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 15 वर्षीय मुलगी ही गोपालनगरात राहते. तर आरोपी आकाश दीपक बोदोडे (वय 20) हा वस्तीच्या बाजूला असलेल्या गायत्रीनगरात राहतो. गेल्या दीड वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली. दोघांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. मुलगी ही दहावीत शिकते. आकाशने दहावीपासून शाळा सोडली असून बेरोजगार आहे. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्या दोघांचेही प्रेमप्रकरण वस्तीत चर्चेत होते. एप्रिल महिन्यात आकाशने तिला जयताळा परिसरातील एका मित्राच्या फ्लॅटवर नेले. दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांनीही अनेक ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. आतापर्यंत मुलीच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. मात्र, मुलीला अचानक उलट्या सुरू झाल्यानंतर आईने डॉक्‍टरांकडे नेले. त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळाली. घरी आल्यानंतर तिला आस्थेने विचारपूस केल्यानंतर आकाशचे नाव समोर आले. त्यामुळे आईने मुलीला ठाण्यात नेऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape on girl