चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Rape
Rape

नागपूर - चार वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले.

पीडित मुलगी व आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. ५ मे रोजी दुपारी ४ ते ५.३० च्या दरम्यान पीडित मुलीची आई स्वयंपाक करीत होती. त्यावेळी ती घराजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपी तिला फ्रूटी देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. तिला फ्रूटी दिली व स्वत:च्या घरात नेऊन अत्याचार केला. संध्याकाळी मुलगी घरी परतली असता ती भेदरलेली होती. ती आजारी असावी, असा तिच्या आई-वडिलांचा समज झाला. पण, शेजारी राहणाऱ्या मुलाला बघून ती घाबरून पळू लागली. एरवी ज्या मुलाकडे ती जायची, त्याला घाबरू लागल्यानंतर तिच्या आई-वडिलांना शंका आली. त्यांनी विचारणा केली असता तिने झालेला प्रकार सांगितला. त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक रवी बारड यांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी मुलाला ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com