नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून युवतीवर बलात्कार 

अनिल कांबळे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नागपूर : खासगी कंपनीत नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून एका युवकाने युवतीला मित्राच्या घरी नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहूल ठाकरे (वय 25, रा. वाठोडा) असे आरोपी युवकाचे नाव आहे. 

नागपूर : खासगी कंपनीत नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून एका युवकाने युवतीला मित्राच्या घरी नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहूल ठाकरे (वय 25, रा. वाठोडा) असे आरोपी युवकाचे नाव आहे. 

पीडित 20 वर्षीय युवती जया (बदललेले नाव) पदवीधर असून ती भांडेवाडीत राहते. तिची वाठोड्यात राहणाऱ्या राहूलशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान जयाला नोकरीची गरज होती. राहुलने तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. तिच्या आईवडीलांना विश्‍वासात घेऊन तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर एका मोबाईल कंपनीत तिला नोकरी लावून दिली. नोकरी लावून देण्यासाठ खूप प्रयत्न करावे लागले तसेच खूप खर्च आला, असे सांगून तो जयाला नेहमी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, ती नेहमी नकार देत होती. दरम्यान तो तिला कार्यालयात सोडून देत होता तसेच सायंकाळी परत आणत होता.

12 ऑगस्टला दुपारी दीड वाजता ती कार्यालयात काम करीत होती. राहुल कार्यालयात आला. त्याने जयाला कस्टमरकडे पैसे आणण्यासाठी जायचे असल्याचे सांगून दुचाकीवर बसण्यास सांगितले. तिला कस्टमरकडे न नेता नंदनवनमधील चांदमारी परीसरात असलेल्या मित्राच्या घरी नेले. तेथे तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुणालाही सांगितल्यास आईवडीलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जया गेल्या दहा दिवसांपासून गप्प होती. मात्र, शेवटी तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर नंदनवन पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

Web Title: rape on girl for reward of job