नागपूरात आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार 

अनिल कांबळे
सोमवार, 28 मे 2018

नवाज अली मोहम्मद इस्माईल मुजावर या युवकाने नागपूरातील 15 वर्षीय मुलीवर एकाच दिवशी दोनदा बलात्कार केला.

नागपूर - आठव्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर नवाज अली मोहम्मद इस्माईल मुजावर (23, रा. एमआयडीसी) या युवकाने एकाच दिवशी दोनदा बलात्कार केला. ही घटना रविवारी एमआयडीसी परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरार आहे. 

नवाज अली हा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. तो मूळचा उत्तरप्रदेशचा असून, एमआयडीसीतील खरडे बनविणाऱ्या कंपनीत कामाला आहे. 15 वर्षीय मुलगी श्‍वेता (बदललेले नाव) व नवाज अलीची अल्पावधीतच मैत्री झाली. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता श्‍वेता नवाजच्या रूमवर गेली. नवाजने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दुपारी तीन वाजता घरी परतली. रात्री आठ वाजता ती पुन्हा नवाजच्या रूमवर गेली. नवाजने तिच्यावर बलात्कार केला. ती रात्री 11 वाजता घरी परतली. त्यामुळे आई-वडिलांना संशय आला. मात्र, तिने रस्ता विसरल्याचे सांगून वेळ मारून नेली. 

खोटारडेणामुळे प्रकरण उघडकीस -
श्‍वेताने रस्ता विसरल्याचे सांगून जेवण न करताच झोपी गेली. मुलगी खोटं बोलत असल्याचे लक्षात येताच सकाळी वडीलाने दम देत विचारणा केली. तिने नवाजच्या घरी होती, असे उत्तर दिले. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली तिने दिली. 

तो मला खूप आवडतो...! 
देखणा असलेला विवाहित नवाज अली नोकरीवर असल्यामुळे रूबाबात राहतो. त्याच्या दिसण्यावर श्‍वेता फिदा झाली. श्‍वेतानेच त्याला प्रपोज केले. 'तो मला खूप आवडतो.' अशी कबुली श्‍वेताने एमआयडीसी पोलिस ठाण्यातील दक्षता पथकाकडे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rape of a girl student in Nagpur