आईच्या प्रियकराचा मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नागपूर - महिलेशी अनैतिक संबंध प्रस्थापित करीत ‘लिव्‍ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या युवकाने तिच्या १९ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. आईच्या प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आईच्या प्रियकराला अटक केली. रितेश पडगलवार (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे.

नागपूर - महिलेशी अनैतिक संबंध प्रस्थापित करीत ‘लिव्‍ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या युवकाने तिच्या १९ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. आईच्या प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आईच्या प्रियकराला अटक केली. रितेश पडगलवार (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे.

 आरोपी रितेश हा जरीपटक्‍यातील हुडको कॉलनीत राहतो. त्याचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून वस्तीत राहणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली. तिचा पती सोडून गेल्यामुळे ती १९ वर्षीय मुलगी सोनू (बदललेले नाव) हिच्यासह राहते. रितेशने सोनूच्या आईशी मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. रितेशचे घरी वेळी-अवेळी येणे सुरू झाले. ही बाब सोनूला खटकत होती. मात्र, तिच्या आईने मुलीची समजूत घालून प्रियकराला घरात खुलेआम एंट्री दिली. रितेशचे नेहमीचेच घरी येणे असल्यानंतर सहा महिन्यांतच तो सोनूच्या घरी राहायला आला. सोनूची आई आणि रितेश ‘लिव इन रिलेशन’मध्ये राहायला लागले. मात्र, दारूचे व्यसन असलेल्या रितेशची वाईट नजर प्रेयसीच्या मुलीवर पडली. तो नेहमी कपडे बदलताना किंवा अंघोळीला जाताना सोनूची छेडखानी करीत होता. मात्र, तक्रार केल्यास आईला वाईट वाटेल, म्हणून ती मुकाट्याने छेडखानी सहन करीत होती. अनेकदा रात्री झोपेत सोनूशी लगट करण्याचा प्रयत्नही रितेशने केला होता. मात्र, आईच्या भीतीपोटी तिने कुणालाही सांगितले नाही. मंगळवारी दुपारी सोनूची आई कामाला गेली होती तर सोनू एकटी घरी होती. रितेशने तिला पाणी घेऊन बेडरूममध्ये बोलावले. ती आल्यानंतर दार आतून बंद केले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी तक्रारीवरून रितेशला अटक केली.

अशी आली घटना उघडकीस
सोनूवर बलात्कार झाल्यानंतर त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने घडलेला प्रकार सायंकाळपर्यंत कुणालाही सांगितला नाही. मैत्रीण घरी आल्यानंतर सोनू रडताना दिसली. त्यानंतर तिने हंबरडा फोडत आईच्या प्रियकराचा प्रताप सांगितला. थेट आईला सांगितल्यास माझ्यापेक्षा प्रियकराची बाजू घेईल, अशी तिला भीती वाटली. मैत्रिणीने तिच्या आईच्या कानावर प्रकार घातल्यानंतर आरोपीचे कृत्य उघडकीस आले.

Web Title: Rape on girls in nagpur

टॅग्स