फेसबुक फ्रेण्डचा प्रेयसीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नागपूर - फेसबुकवरून मैत्री केल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवतीवर प्रियकराने बलात्कार केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

मयूर अशोक करवा (रा. सोलापूर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय युवती रामेश्‍वरी अजनीत राहते. २०१५ मध्ये ती एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होती. दरम्यान, तिची फेसबुकवरून मयूर कारवाशी ओळख झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यामुळे तिने इंदिरा मातानगरात किरायाने खोली घेतली. दोघेही तेथे काही दिवस सोबत राहिले. मयूरने तिचे लैंगिक शोषण केले. 

२०१८ मध्ये मयूरने दुसऱ्या एका युवतीशी लग्न केले. ही बाब कळताच तिने मयूरला जाब विचारला. मात्र, त्याने तिला विसरून जाण्याचा सल्ला दिला आणि फोन बंद केला. त्यामुळे चिडलेल्या युवतीने मयूरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape on Lover by Facebook Friend crime