रेल्वेप्रवासातील ओळखीनंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - रेल्वे प्रवासात ओळख झालेल्या युवकाने असाह्यतेचा लाभ घेत अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केला. रेल्वे प्रवासात विनातिकीट सापडल्याने घटनेचे बिंग फुटले. लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

नागपूर - रेल्वे प्रवासात ओळख झालेल्या युवकाने असाह्यतेचा लाभ घेत अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केला. रेल्वे प्रवासात विनातिकीट सापडल्याने घटनेचे बिंग फुटले. लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

पीडित 16 वर्षीय मुलगी हावड्याची राहणारी आहे. रागात घर सोडले आणि पुण्याला निघून गेली. घरची आठवण आल्याने ती परत गावी जाण्यासाठी रेल्वेत बसली. प्रवासात तिची विजय नावाच्या युवकासोबत ओळख झाली. ती असाह्य असल्याने विजयने जवळीक वाढविली. यानंतर मदत करण्याची बतावणी करीत तिला जळगाव स्थानकावर उतरवून घेतले. तिथल्याच हॉटेलमध्ये दोन दिवस थांबून अत्याचार केला. यानंतर तिला गावी निघून जाण्यास सांगितले. 

हावड्याला पोहोचताच तिने मामांना फोन केला. त्यांनी समजून घेण्याऐवजी तिला झापले. यामुळे रागात ती जळगावला निघून गेली. तिथे पुन्हा विजय भेटला. यावेळीही त्याने अत्याचार केला आणि हावड्याला परत जाण्यास सांगितले. तिकीट काढून न देताच तिला रेल्वेत बसवले. ती एकटीच प्रवास करीत नागपुरात पोहोचली. तिच्याकडे तिकीट नसल्याचे निरीक्षकाच्या लक्षात आले. निरीक्षकाने जाब विचारताच ती रडायला लागली आणि कॅफीयत मांडली. यामुळे तिला रेल्वेतून उतरवून घेत लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. मात्र, पीडितेला त्याच्या नावाशिवाय काहीच माहिती नाही. पीडितेला चाईल्ड लाईन कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केले आहे. 

घर सोडून पळालेल्या तीन मुली गवसल्या 
रेल्वे सुरक्षा दलाचे पथक गुरुवारी दुपारी रेल्वेस्थानकावर गस्त घालत असताना घर सोडून आलेल्या तीन अल्पवयीन मुली आढळल्या. त्यातील एक पारडीतील, तर दोघी छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथील रहिवासी आहेत. घरी कुणालाही न सांगता पळून आल्याचे चौकशीत तिघींनीही मान्य केले. तिघींनाही सुरक्षेच्या दृष्टीने चाईल्ड लाईनच्या ताब्यात दिले. तिथून त्यांची रवानगी चाईल्ड केयर सेंटरमध्ये करण्यात आली.

Web Title: rape on minor girls after the introduction of railway trips