कामठीत अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र


कामठी : जुने पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वारीसपुरा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलावर बालकाचे लैंगिक शोषण अत्याचार कायद्यांतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या कलम 6, 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक शोषण होत होते ते हॉटेल स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे.

सविस्तर असे की, वारीसपुरा येथे राहणारी 17 वर्षीय मुलगी दोन वर्षांपूर्वी बहिणीच्या लग्नात असताना मुलाने तिला प्रपोच केले होते. पुढे व्हॅलेंटाइन दिनी मुलाने मुलीला शहरातील नवीन कामठी पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कळमना मार्गावरील एका हॉटेलमध्ये नेऊन बळजबरीने संभोग करून तिचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. त्याचा धाक दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक सुखाची मागणी करू लागला. मागणी मान्य न केल्यास व्हॉट्‌सऍप, फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तसेच लग्नाचे खोटे अमिष दाखवून संबंध प्रस्थापित करीत होता. 12 नोव्हेंबरला मुलाने मुलीला जबरीने घरून नेऊन संभोग केला. घरी मुलगी परतल्यावर मुलीचा मोबाईल घरच्यांनी चेक केला असता मुलीच्या मोबाईलवर अश्‍लील प्रकारचे मेसेज दिसून आले. मुलीने घरच्यांना सर्व आपबीती सांगितली. मुली व मुलाच्या घरच्यांनी एका प्रतिष्ठित व्यक्तीने दोन्ही परिवारांची बैठक करून दिली. मात्र मुलाने लग्नाला नकार दिल्याने जुने कामठी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली. चौकशीअंती अखेर पोलिसांनी विविध कलमांतर्गत मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास कंठाले यांच्या मार्गदर्शनात दुय्यम पोलिस निरीक्षक परदेशी करीत आहेत.

अनेक दलाल सक्रिय
देव्हव्यापारातील अनेक दलाल सक्रिय होऊन कॉलेज तरुणींना आपल्या मोहजाळ्यात अडकवीत आहेत. नुकतेच डीसीपी स्कॉडने रमानगर येथे गेल्या कित्येक महिन्यांपासून गुप्तरीतीने सुरू असलेला देहव्यापार धाड घालून उघडकीस आणला. तसेच मागील वर्षी कुंभारे कॉलनी, यशोधरानगर, कामठी-नागपूर रोडवरील लॉज आदी ठिकाणी पोलिसांनी धाडी घातल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com