लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर : कार्यालयात काम करीत असताना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन युवकाने सहकारी कर्मचारी युवतीवर वारंवार बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. युवतीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी युवक कुणाल किशोर सावरकर (27, रा. पॉवरग्रीड चौक)विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय युवती न्यू इंदोऱ्यात राहते. रिक्रूटमेंट कंपनीत असताना तिची सहकारी कुणालशी ओळख झाली. ओळखीनंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. एक सप्टेंबर 2018 रोजी युवती व मैत्रीण हे कुणालसोबत शेगाव दर्शनासाठी गेले. तेथे रात्रभर मुक्‍काम केल्यानंतर एकांताचा फायदा घेऊन कुणालने युवतीवर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. नागपुरात परत आल्यानंतर युवतीच्या घरी कुणी नसताना तो बळजबरीने घुसून शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागला. त्याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला रीतसर घरी नेऊन आई मीना व वडील किशोर यांची भेट घालून दिली. दोघांचेही आईवडील लग्नासाठी तयार झाले. मात्र, काही दिवसांपूर्वी कुणालचे दुसऱ्याच युवतीशी सूत जुळले. ते प्रेमप्रकरण युवतीला कळल्यानंतर जाब विचारला. कुणालने तिला लग्नास नकार दिला. त्यामुळे तिने जरीपटका पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून कुणाल सावरकरसह आईवडिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape by a woman