गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार

File photo
File photo

नागपूर : युवतीला कोल्ड्रिंक्‍समध्ये गुंगीकारक औषध टाकून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढून तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. समीर अस्मत खान (वय 27, रा. उद्योग बिल्डिंग आशियाना, मोतीबाग) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित 25 वर्षीय सोनिया (बदललेले नाव) ही जरीपटक्‍यात राहते. ती डान्सर असून तिची सदरमध्ये राहणाऱ्या समीर खानशी 2017 मध्ये ओळख झाली. समीर हा इव्हेंट मॅनेजर आहे. त्याच माध्यमातून तिची समीरशी मैत्री झाली. दोघेही सोबत इव्हेंटची कामे करीत होते. यादरम्यान त्यांची मैत्री घट्‌ट झाली. 26 ऑक्‍टोबर 2017 रोजी समीरने तिला व्हीसीएजवळील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या कामासाठी बोलावले. तेथे दोघांनी ड्रिंक्‍स केले. समीरने तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला कारमधून अपहरण करून एका फार्महाउसवर नेले. रात्रभर तिच्यावर बलात्कार केला. अंतरंगाचे मोबाईलने शूटिंग केले तसेच अश्‍लील फोटोही काढले. सकाळी ती शुद्धीवर येताच तिला प्रकार लक्षात आला. समीरने तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने कुणाकडेही तक्रार केली नाही.
वारंवार शारीरिक संबंधाची मागणी
सोशल मीडियावर अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार फार्महाउस, हॉटेल आणि घरी नेऊन बलात्कार करीत होता. वारंवारच्या लैंगिक शोषणाला ती कंटाळली होती. मात्र, इभ्रतीचा प्रश्‍न असल्यामुळे ती निमूटपणे समीरने बोलावलेल्या ठिकाणी जात होती.  
अश्‍लील नृत्यासाठी तगादा
सोनिया ही डान्सर असून इव्हेंटमध्ये तसेच पार्टीमध्ये समीरसोबत डान्स तसेच अन्य कामे करते. मात्र, समीर तिला पार्ट्यांमध्ये अश्‍लील डान्स करण्यासाठी दबाव टाकत होता. तसेच तिला मित्रांसोबत आणि ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता.  
युवती चार महिन्यांची गर्भवती
सोनियाला समीरने लग्न करण्याचे आमिष दाखवले होते. गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्यानंतर त्याने सोनियाला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यादरम्यान सध्या सोनिया चार महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे तिने बदनामीच्या भीतीपोटी समीरला लग्न करण्याची गळ घातली. मात्र, त्याने लगेच लग्नास नकार देऊन मारहाण करीत तिला हाकलून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com