बदनामीची भीती दाखवून विवाहितेवर बलात्कार

अनिल कांबळे
शनिवार, 31 मार्च 2018

आरोपीने बदनामी करण्याची धमकी देऊन शहरातील अनेक लॉज आणि पर्यटनस्थळी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपी दर्शन उर्फ नंदू लिलाधर सोमकुवर (वय 32, रा. रमाबाई चौक, आंबेडकर नगर) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

नागपूर : बदनामी करण्याची भीती दाखवून वाडीत राहणाऱ्या 32 वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना वाडीत उघडकीस आली.

आरोपीने बदनामी करण्याची धमकी देऊन शहरातील अनेक लॉज आणि पर्यटनस्थळी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपी दर्शन उर्फ नंदू लिलाधर सोमकुवर (वय 32, रा. रमाबाई चौक, आंबेडकर नगर) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडित महिलेचे लग्न झाले असून आरोपीने तिच्या पतीला प्रेमसंबंधाबाबत माहिती दिली. त्यामुळे तिच्या पतीने तिला घरातून हाकलून दिले.

त्यानंतर आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेने लग्नाचा तगादा लावला असता आरोपीने लग्नास नकार दिला. या प्रकरणी तक्रारीवरून वाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Web Title: rape on women in Nagpur