अबब! नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाजवळ आढळला दुर्मीळ सरडा...कसा बदलतो रंग वाचा...

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 8 July 2020

हा सरडा श्रीलंका, भारत, दक्षिण आशिया व इतर भागात आढळणाऱ्या "गिरगिटांची' एक प्रजाती आहे. तो ज्या झाडावर किंवा खोडावर बसलेला असेल त्या रंगात तो मिसळून जातो. म्हणजे तो आपला रंग वारंवार बदलून घेतो. जेणेकरून इतर शिकारी पक्ष्यांपासून रक्षण व्हावे, हा त्याचा उद्देश असतो.

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : आपल्या देशात विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी आढळतात. त्यांची दिनचर्चा कसी काय असते याचा अभ्यासही वन्यप्रेमींना केली आहे. पण गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाजवळ एक वेगळ्याच प्रजातीचा दुर्मीळ सरडा आढळून आल्याने वन्यप्रेमी, पक्षीप्रेमींच्या अभ्यासात भर पडली आहे. कसा आहे हा सरडा जाणून घेऊ या.

 

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाजवळील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये सोमवारी (ता. 6) नवेगावबांधचे गाईड कैलास लाडे यांना धाबेटेकडी-पवनी मार्गावर "रंग बदलणारा सरडा' आढळला.

 

त्यामुळे या सरड्याला त्यांनी सुरक्षितरीत्या पकडून नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात सुखरूप सोडून दिले. यावेळी नवेगावबांधचे वनरक्षक अमोल चौबे यांनी या रंग बदलणाऱ्या सरड्याचे छायाचित्रही टिपले.

जीभ लांब फेकून पकडतो भक्ष्य

हा सरडा "गिरगिट' नावाने ओळखला जातो. इंग्रजीमध्ये त्याला "इंडियन चामेलॉन' असेदेखील म्हटले जाते. त्याची विशेषतः म्हणजे तो अत्यंत जलदगतीने आपला रंग बदलू शकतो. तसेच तो आपली जीभ लांब करून भक्ष्य पकडू शकतो. हा सरडा श्रीलंका, भारत, दक्षिण आशिया व इतर भागात आढळणाऱ्या "गिरगिटांची' एक प्रजाती आहे.

शिकाऱ्यांपासून संरक्षणासाठी बदलतो रंग

या गिरगिटांची विशेषतः म्हणजे, तो सहजासहजी दिसत नाही. तो ज्या झाडावर किंवा खोडावर बसलेला असेल त्या रंगात तो मिसळून जातो. म्हणजे तो आपला रंग वारंवार बदलून घेतो. जेणेकरून इतर शिकारी पक्ष्यांपासून रक्षण व्हावे, हा त्याचा उद्देश असतो.

जाणून घ्या : या जिल्ह्यातील तीन गावांना दरवर्षीच होतो पुराचा वेढा...पावसाळ्यात तुटतो संपर्क

दुर्मीळ सरड्याचे दर्शन
महत्त्वाचे म्हणजे, हा सरडा आपले दोन्ही डोळे चारही बाजूला फिरवून पाहू शकतो. अशा दुर्मीळ सरपटणाऱ्या प्राण्यांचे दर्शन होणे अत्यंत आनंदाची बाब आहे.
- साहेबाज शेख, प्राणी व पक्षीप्रेमी, सडक अर्जुनी.