ईएमव्ही विरोधात ठराव घेण्याची राष्ट्रवादीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भिवापूर (नागपूर जिल्हा) : निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालून त्या ऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे मागणी करण्याचा ठराव 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

भिवापूर (नागपूर जिल्हा) : निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालून त्या ऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे मागणी करण्याचा ठराव 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
सध्या निवडणुकीत मतदानाकरिता वापर करण्यात येत असलेले ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांच्या विश्वसनीयतेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच कारणांमुळे अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमच्या वापरावर बंदी घालून मतदानाकरिता बॅलेट पेपरचा (मतपत्रिकेचा) वापर सुरू केला आहे. भारतातही ईव्हीएम हद्दपार करून मतदानाकरिता मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात देशव्यापी अभियान सुरू केले आहे. राज्यातीलही सर्वच विरोधी पक्षाकंडून ईव्हीएम हटाव मोहीम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये ईव्हीएमचा वापर बंद करण्यासंदर्भातील निवडणूक आयोगाकडे मागणी करण्याविषयीचा ठराव घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामसभेत ठरावासाठी अर्जाचा नमुना कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिला आहे.
ईव्हीएम विरोधात ग्रामसभेद्वारे ठराव घेण्याकरिता जिल्ह्यातील राकॉंच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्याकरिता रीतसर अर्ज करावा.
- शिवराज (बाबा) गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नागपूर जिल्हा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rastrawadi conggress demand for resolution against EMV