टाटा यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

Mohan and Ratan
Mohan and Ratan

नागपूर - सुप्रसिद्ध उद्योजक व टाटा अँड सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी नुकतीच नागपूरमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. संघाने ही भेट औपचारिक असल्याचे म्हटले असले तरी, या भेटीची चांगलीच चर्चा शहरात आहे.

प्राप्त माहितीनुसार, ते मंगळवारी रात्री शहरात दाखल झाले होते. रात्रभर हॉटेलमध्ये मुक्काम केला. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता संघ मुख्यालयात दाखल झाले. सुमारे अर्धा तास त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. ही भेट अतिशय गुप्त ठेवली होती. कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते नागपूरला आले होते, असे संघ वर्तुळातून सांगण्यात येते.

यापूर्वी 28 डिसेंबर 2016 ला ते सरसंघचालकांच्या भेटीसाठी नागपूरला येऊन गेले. त्या वेळी भाजपच्या नेत्या व कार्पोरेट क्षेत्रातील समन्वयक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शायना एनसी त्यांच्यासोबत होत्या. तेव्हापासून टाटा संघावर मोकळेपणाने बोलू लागले. त्यानंतर 24 ऑगस्ट 2018 ला मुंबई येथे स्व. नाना पालकर जन्मशताब्दी कार्यक्रमात ते सरसंघचालकांसोबत व्यासपीठावर सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com