चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला !

श्रीधर ढगे
सोमवार, 16 डिसेंबर 2019

खामगाव (जिल्हा बुलडाणा) : चिकनच्या दरात सध्या घट झाली असली तरी कांदा, तेल आणि मसाले महागले आहेत. त्यामुळे आता चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला ही म्हण लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

खामगाव (जिल्हा बुलडाणा) : चिकनच्या दरात सध्या घट झाली असली तरी कांदा, तेल आणि मसाले महागले आहेत. त्यामुळे आता चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला ही म्हण लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

हिवाळ्यात लोक मांसाहार जास्त करतात. त्यामुळे चिकनची मागणीही वाढत आहे. खामगाव तालुक्यात प्रामुख्याने मटन, चिकन आणि मासे हे मांसाहारांसाठी वापरले जातात. मटन, गावरान चिकन, फिशला 450 रुपये किलोचा दर असल्याने खवय्यांना हे महाग पडते. मात्र पोल्ट्री फार्मचे उत्पादन यंदा चांगले झाले असल्याने चिकन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. परिणामी हिवाळ्यात मागणी जास्त असतांना सुध्दा चिकनच्या दरात घट झाली आहे. बाजारात सध्या चीकनचा दर 120 प्रतिकिलो असून जास्त खरेदी केल्यास हॉटेल व्यावसायिकांना 100 ते 110 रुपये किलोने चिकन मिळते. हॉटेलमध्ये चिकन लॉलीपॉप, चिकन 65, चिकन तंदुरी, करी यासह चिकनपासून विविध लज्जतदार पदार्थ बनविल्या जातात. खामगाव शहरात चिकन स्वस्त झाले असल्याने हैदराबाद बिर्याणी नावाने बरेच हॉटेल सुरू झाले आहेत. हैदराबाद येथे मिळणारी स्वादिष्ट बिर्याणी खामगाव शहरात मिळत असल्याने त्यास नागरिकांची पसंती मिळत आहे.

हेही वाचा -  विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत

खिश्याला झळ
लोक घरी मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना चिकनचे सूप, भाजी खायला देतात. त्यामुळे चिकनच्या मागणीत वाढ झालेली आहे. चिकनचे दर कमी असले तरी चिकनचे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य मात्र महागले आहे. कांदा, तेल आणि मसाले महाग असल्याने चिकन चव घेताना खिश्याला झळ पोहचत आहे. त्यामुळेच चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला असा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत आहे.

No photo description available.

पोल्ट्री व्यवसायात संधी
अंडी, चिकनची वाढती मागणी लक्षात घेता पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी तरुणांना संधी आहे. चिकन, कडकनाथ, गावरान कोंबडी संगोपन करून तरुण या व्यवसायात करिअर करू शकतात. त्यासाठी शासनाकडून कर्जपुरवठा सुद्धा मिळतो. प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय करता येतो.

हेही वाचा - मराठा तरुणांना कर्ज देण्यास बॅँका निरुत्साही

मागणी वाढत असल्याने दारात वाढ होण्याची शक्यता
नेहमीच चिकनची मागणी जास्त असते मात्र हिवाळ्यात यात अधिक भर पडते. यावर्षी चिकन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या चिकनचा दर 120 रुपये किलो आहे. मागणी वाढत असल्याने या दारात वाढ होण्याची शक्यता आहे.
- मो.सादिक, चिकन विक्रेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate of chicken is declining spice expensive