रौनक, दिव्याचे निर्णायक विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : अबुधाबी येथे सुरू असलेल्या 26 व्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील सातव्या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानी व आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुखने निर्णायक विजय नोंदविले. रौनकने सातव्या फेरीत भारताचा फिडेमास्टर मनुष शाहला पराभूत केले. या विजयामुळे रौनकचे चार गुण झाले आहेत. दिव्यानेही भारतीय महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रिचा पुजारीला नमवून पूर्ण गुण वसूल केले. दिव्याचे सात फेऱ्यांमध्ये साडेतीन गुण आहेत. नागपूरचीच महिला चेसमास्टर मृदुल डेहनकरनेही (2 गुण) भारतीय ग्रॅण्डमास्टर गोम्स मेरी ऍनला बरोबरीत रोखून अर्धा गुण मिळविला.

नागपूर : अबुधाबी येथे सुरू असलेल्या 26 व्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील सातव्या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानी व आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुखने निर्णायक विजय नोंदविले. रौनकने सातव्या फेरीत भारताचा फिडेमास्टर मनुष शाहला पराभूत केले. या विजयामुळे रौनकचे चार गुण झाले आहेत. दिव्यानेही भारतीय महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रिचा पुजारीला नमवून पूर्ण गुण वसूल केले. दिव्याचे सात फेऱ्यांमध्ये साडेतीन गुण आहेत. नागपूरचीच महिला चेसमास्टर मृदुल डेहनकरनेही (2 गुण) भारतीय ग्रॅण्डमास्टर गोम्स मेरी ऍनला बरोबरीत रोखून अर्धा गुण मिळविला. संकल्प गुप्ताला (2.5 गुण) मात्र फिडेमास्टर अनिरुद्ध देशपांडेकडून पराभवाचा सामना करावा लागला. आठव्या फेरीत रौनकची लढत फिडेमास्टर नितिष बेलुरकरविरुद्ध, दिव्याची आंतरराष्ट्रीय मास्टर कोस्टाची मिनियाविरुद्ध, मृदुलची इशा शर्माविरुद्ध, तर संकल्पची लढत फिलीपाइन्सच्या ताबेदा जोबानीविरुद्ध होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raunak, Divya won