नितीन राऊत समर्थकांचा महापौर, आमदारांना घेराव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नागपूर : उत्तर नागपुरात लष्करीबागेतील बाजीराव साखरे ई-ग्रंथालयाच्या लोकार्पण समारंभात माजी मंत्री नितीन राऊत यांना आमंत्रित न केल्याने तसेच पत्रिकेत नाव घेतल्याने समर्थकांनी शनिवारी घोषणाबाजी केली. राऊत समर्थकांनी महापौर नंदा जिचकार व आमदार डॉ. मिलिंद माने यांना घेराव करीत प्रश्‍नांचा भडीमार केला. महापौर नंदा जिचकार यांनी भाषणातून नितीन राऊत, नगरसेवक संदीप सहारे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करीत माजी मंत्री राऊत यांचे नाव कोनशिलेवर कोरण्यात येईल, असे सांगितले.

आघाडी सरकार असताना राज्य सरकारच्या दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माजी मंत्री नितीन राऊत यांनी ई-ग्रंथालयासाठी चार कोटींचा निधी दिला होता. शनिवारी लष्करीबागेतील या ई-ग्रंथालयाचे लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आमदार डॉ. माने तासाभरापूर्वीच कार्यक्रमस्थळी आले. त्यावेळी राऊत समर्थक उपस्थित होते. राऊत समर्थकांनी त्यांना थेट "तुमचे काय योगदान?', असा प्रश्‍न विचारला. तेवढ्यात महापौर नंदा जिचकार कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. डॉ. माने व महापौरांचा घेराव करीत राऊत समर्थकांनी घोषणाबाजी केली. राऊत समर्थकांनी आमदार डॉ. माने यांना एक रुपया दिला नाही, असा टोला हाणला तर राऊत यांचे नाव पत्रिकेत नाही, त्यांना निमंत्रितही केले नसल्याने संताप व्यक्त केला.
नगरसेवक संदीप सहारे आदींनी नागरिकांना शांत केले. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात कार्यक्रम सुरू झाला. नगरसेवक संदीप सहारे यांनीही भाषणातून महापालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याचा तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांनी चार कोटी दिल्याचा उल्लेख केला. त्यांनी पाच वर्षांपासून आमदार डॉ. माने यांनी निधी न दिल्याने ई-ग्रंथालयाचे लोकार्पण झाले नसल्याचा आरोपही केला. नागरिकांचा रोष बघता महापौर नंदा जिचकार यांनी भाषणातून येथे अत्याधुनिक, मोठे वाचनालय व्हावे यासाठी माजी मंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. नगरसेवक संदीप सहारे यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. आता सर्व प्रशासकीय अडचणी दूर करून विद्यार्थ्यांसाठी हे खुले करताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raut supporters mayor, MLA besieged