'एक दिवस शहीदांसाठी' खामगावात 'रावा'कुटुंबाचा उपक्रम

khamgaon
khamgaon

खामगाव : रावा कुटुंबीयांच्या वतीने “एक दिवस शहीदांसाठी” हा श्रद्धांजलीपर कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील साहेब, शहर पोस्टेचे ठाणेदार संतोष ताले साहेब तसेच दहा वर्षे आधी मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला होता, त्यावेळेस कर्तव्यावर असणारे आपली कर्तेव्य बजावत असणारे कर्तव्यदक्ष शिवाजी नगर पोस्टेचे ठाणेदार रवींद्र देशमुख साहेब यासह विशेष उपस्थिती म्हणून नुकताच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित झालेला ”नाळ” चित्रपटामध्ये नागराज मंजुळे यांच्या सोबत सहकलाकाराची भूमिका साकारणारे अँड.गणेश देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये अतिरेकी हल्ल्या मध्ये शहीद झालेल्या शहिदांना पुष्पचक्र व मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,या कार्यक्रमांमध्ये ठाणेदार देशमुख साहेब यांनी दहा वर्षे आधी घडलेला अतिरेकी हल्ला बाबत त्यांचा तो थरारक प्रसंग नागरिकांना सांगितला त्यावेळी सांगत असताना देशमुख साहेब भावुक झाले होते व तो प्रसंग सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. समोर बसलेल्या कार्यक्रम मधील सर्वजण त्यांना पाहून भावुक झाले होते.

तसेच चित्रपट कलाकार गणेश देशमुख यांनी सुद्धा नाळ चित्रपटा बाबत व अनुभव व त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत संपूर्ण अनुभव सांगितला यावेळी कुटुंबातील सदस्य प्रवीण ठाकरे ,विवेक पारस्कार सर,सतिश भावसार सर ,शितल ठाकरे यांनीसुद्धा आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक महिला वर्ग कुटुंबातील सदस्य, पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सूर्वे व पूजा कोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रुती बडेरे हिने केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमाचे यशस्वीते साठी  कुटुंबातील अमोल गावंडे, कुणाल देशपांडे, नितीन सूर्वे, कुशल देशपांडे, गोविंद राजपूत, गौरव इंगळे ,निखिल इंगळे, उत्कर्ष बडगुजर, श्रुती बडेरे, देव्यानी देशमुख, मोनाली वानखडे, विवेक गावंडे, शिवाजी भोसले, महेंद्र बनसोड ,वैभव फाटकर, सुमित बडेरे,श्रुतिक सावळे, आयशा नागवानी, शुभम टेंभे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com