कस्तुरचंद पार्कवर रावणदहन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : सनातन युवक सभाद्वारे कस्तुरचंद पार्क येथे आयोजित 68 वे दसरा महोत्सवादरम्यान रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचे उत्साहात दहन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाका शोने दसरा महोत्सव उजळून निघाला.

नागपूर : सनातन युवक सभाद्वारे कस्तुरचंद पार्क येथे आयोजित 68 वे दसरा महोत्सवादरम्यान रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचे उत्साहात दहन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाका शोने दसरा महोत्सव उजळून निघाला.

दसरा महोत्सवात यंदा "सीता स्वयंवर' नाटिका हे मुख्य आकर्षण होते. नाटिकेत रामायणातील विविध प्रसंगांचे कलाकारांनी यथोचित सादरीकरण केले. लाइट ऍण्ड साउंड शो आणि 45 वादक असलेल्या ढोल-ताशा पथकाने कार्यक्रमात रंगत आणली. इस्कॉन मंडळाच्या संकीर्तन आणि स्वर विहार संस्थेच्या कलाकारांनी भक्तिगीत सादर करून मंत्रमुग्ध केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी
च्या 150 जयंतीनिमित्त डॉ. नरेश अग्रवाल यांनी महात्मा गांधींची वेषभूषा धारण केली होती. जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर निनादला. बहुरंगी फटाका शोनंतर विधिवत पूजा करून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्राणनाथ साहनी, विभागीय आयुक्त संजीव कुमार, आमदार गिरीश व्यास, ऊर्मिला रमेशचंद्र अग्रवाल, नगरसेवक संजय बुर्रेवार, निशांत गांधी, पोलिस उपायुक्त विनीता शाहू, उद्योगपती किशोर राय, नितीन खारा, जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना स्मृतिचिन्ह देत, त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravandhan at Kasturchand Park