पिंपळोद येथे आढळले खवले मांजर, बघ्यांची तोबा गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

पिंपळोद येथे आढळले खवले मांजर, बघ्यांची तोबा गर्दी 
येवदा (जि. अमरावती) : दर्यापूर तालुक्‍यातील पिंपळोद येथे दुर्मीळ प्रजातीत मोडत असलेले खवले मांजर आढळले. यामुळे परिसरात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या विचित्र दिसणाऱ्या प्राण्याबद्दल बहुतांश जणांना माहिती नाही. त्यामुळे काहीवेळ पिंपळोद येथील नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले होते. परंतु, इंटरनेटच्या साहाय्याने येथील सुजाण नागरिकांनी या प्राण्याची माहिती शोधून काढली व या प्राण्याला जीवदान मिळाले.

पिंपळोद येथील रहिवासी दिनकर डोरस यांना त्यांचे भाऊ दिलीप डोरस यांच्या घराकडे जाताना सायंकाळच्या सुमारास हे खवले मांजर दिसले. त्यांनी इतरांना याबाबत माहिती देताच नागरिकांनी याठिकाणी एकच गर्दी केली व त्याला पकडून पिंजऱ्यात ठेवले. त्यानंतर याची माहिती येथील पोलिस पाटील भुजंग गावंडे यांना देण्यात आली. त्यांनी वनविभागाला याबाबत कळविले. रात्री 12 वाजताच्या सुमारास दर्यापूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोहोचून हे खवले मांजर ताब्यात घेतले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The raven cat found at Pimpalod