आमदार रवी राणा यांना रॅली दरम्यान आली भोवळ; खासगी रुग्णालयात दाखल

MLA Ravi Rana got dizzy during the rally
MLA Ravi Rana got dizzy during the rallyMLA Ravi Rana got dizzy during the rally

नागपूर : दिल्लीतील पटियाला कोर्टातून ट्रांझिक बेल मिळाल्यानंतर गुरुवारी (ता. २४) आमदार रवी राणा (Ravi Rana) नागपुरातील विमानतळावर आले. येथे पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते अमरावती गेले. तब्बल १५ दिवासांनी अमरावतीत दाखल झाल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी काढलेल्या रॅलीत त्यांना भोवळ आली. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (MLA Ravi Rana got dizzy during the rally)

दिल्लीतील पटियाला कोर्टातून आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना २८ फेब्रुवारीपर्यंत ट्रांझिक बेल देण्यात आली आहे. यानंतर ते प्रथमच नागपुरात व नंतर अमरावतीत दाखल झाले. अमरावतीचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक प्रकरणाच्या दिवशी दिल्लीत असलेले आमदार रवी राणा यांचे गुरुवारी (ता. २४) शहरात आगमन होताच युवा स्वाभिमान पक्षाच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले.

MLA Ravi Rana got dizzy during the rally
राणा म्हणाले, ‘बाळासाहेब असताना शिवसेना होती; ही शिवसेना नाही तर...’

दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आमदार रवी राणा (Ravi Rana) अमरावतीत पोहोचले. इर्वीन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी पायदळ फेरी काढली. इर्वीन चौक, कॉटनमार्केट, मालवीय चौका समोरून, जयस्तंभ चौकात फेरी पोहोचली. येथे फेरीचा समारोप झाला. यावेळी महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने हजेरी होती. अनेकांनी राणांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

जयस्तंभ चौकात आली भोवळ

शहरात आगमनानंतर समर्थकांच्या उपस्थितीत आमदार रवी राणा यानी इर्वीन चौकातून फेरी काढली. मालवीयचौक मार्गाने जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला राणांनी हारार्पण केले. तेथून फेरी समाप्तीनंतर परत जात असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यानंतर थोड्याच वेळाने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

MLA Ravi Rana got dizzy during the rally
रशियाची अचूक रणनीती : तीन बाजूंनी सैन्य तर चौध्या बाजूने...
आमदार रवी राणा यांचा जामीन अर्ज अद्याप स्थानिक न्यायालयात दाखल झालेला नाही. उर्वरित चौघांच्याही जामीन अर्जावर आज (ता. २४) सुनावणी झाली. त्यावर निर्णय व्हायचा आहे.
- अ‍ॅड. दीप मिश्रा, बचाव पक्षाचे वकील

कार्यकर्त्यांनी बसवले होते गाडीत

दिल्लीत असताना माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला. आज ट्रांझिक बेल घेऊन राज्यात आलो आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे आमदार रवी राणा (Ravi Rana) नागपुरात म्हणाले होते. यानंतर ते आपल्या जिल्ह्यात म्हणजे अमरावतीत गेले. तिथे पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये (Rally) ते पायी फिरत असल्याचे दिसत होते. यावेळी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना भोवळ (Dizzy) आली. यावेळी ते पडले. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना गाडीत बसवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com