रविशंकर प्रसाद म्हणतात, महात्मा गांधी "भारतरत्न'पेक्षा मोठे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नागपूर  : स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासोबत महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याचे जाहीरनाम्यात समावेश केल्याने कॉंग्रेस चिंतित का होत आहे, असा सवाल करीत केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी महात्मा गांधी हे "भारतरत्न'पेक्षा मोठे असल्याचे सांगितले. 

सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 50 वर्षांनंतर भारतरत्न देण्यात आले. परिवाराबाहेर सदस्य प्रधानमंत्री पदावर असल्याने त्यांना भारतरत्न देण्यात आले. कॉंग्रेसने पंडित नेहरू, राजीव गांधी यांना भारतरत्न दिले. सावरकर यांचे योगदान मोठे आहे. 11 वर्षे यांनी अंदमानच्या तुरुंगात घालवली. त्यांना भारतरत्न देण्यास हरकत काय, असेही ते म्हणाले. महात्मा गांधींचा भाजपतर्फे यथोचित सन्मान केला जात आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पक्षाकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले असून पक्षाचे नेतेही सामील झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी खासदार विजय सोनकर, आमदार गिरीश व्यास, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, धर्मपाल मेश्राम, चंद्रन गोसावी, संजय भेंडे उपस्थित होते. 
मंदीचा फटका बसणार नाही 
संपूर्ण जगात मंदी आहे. भारताला याचा फटका पडणार नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे. यावर्षी 16 बिलियन विदेशी गुंतवणूक झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. बेरोजगारी नसून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाल्याची आकडेवारी त्यांनी दिली. अडचणीच्या प्रश्‍नावर "नो कमेंट' म्हणून उत्तर देण्याचे टाळले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi Shankar Prasad says Mahatma Gandhi is bigger than Bharat Ratna