शेतकऱ्यांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जावू नये: तुपकर

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar

मूर्तिजापूर : शेतकरऱ्यांप्रती बेजबाबदार शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नको त्यांच्या कृषी उत्पादनास हमी भाव पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत दुपकर यांनी केले.

येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या एक दिवसीय धरणे आंदोलना दरम्यान ते बोलत होते. भाजपा सरकारकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीची मिमिक्री करीत मोदींना रात्रीचा नाद असल्याचे नमुद करतांना त्यांनी जीएसटी, फुलतांब्याचा निर्णय आदी उदाहरणे दिली. शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरणाचा निषेध करीत शेतकऱ्यांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जावू नये असा दम त्यांनी शासनाला भरला वा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

प्रख्यात विचारवंत डॉ. श्रीकांत तिडके यांनी शेती व्यवसायाला गोवंश पालनाची जोड देत त्या माध्यमातून गोवंश रक्षणाची जबाबदारी शेतकरी पार पाडत आहे, मात्र वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण शासनाने करण्याची आवश्यकता अधोरेखीत केली. प्रगती शेतकरी मंचाचे राजू वानखडे, शेकापचे विजय गावंडे, भारतीय किसान संघचे राहूल राठी, श्रावण रणबावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचे संयोजक अरूण बोंडे यांच्यासह न्यु यंग क्लब फार्मर्स, प्रगती शेतकरी मंच, भारतीय किसान संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनमंच या सर्व संघांना धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी केले.

एसडीओ पोचले, निवेदन स्विकारले
आंदोलकांना उपविभागीय अधिकारी अथवा तहसीलदार यांना शेतकरी मागण्यांचे निवेदन द्यायचे होते, परंतु दोन्ही अधिकारी कार्यालयत उपस्थित नसल्याने निवेदन कोणाकडे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला. जोपर्यंत अधिकारी येणार नाहीत तो पर्यंत आंदोल स्थगित करणार नाही, आशी भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली. त्यामुळे वातावरण थोडे तापले होते. राजु वानखडे यांनी मध्यम मार्ग काढत निवेदन न देण्याचा निर्णय झाला. राजु वानखडे यांच्या निवासस्थानी रविकांत तुपकर, डॉ.श्रीकांत तिडके व काही आंदोलनकर्ते थांबले होते. संध्याकाळी सातच्या दरम्यान एसडीओ तिथे पोचले व निवेदन स्विकारले. तुपकर यांनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com