Maharashtra vidhansabha 2019 नामनिर्देशन स्वीकारण्याची तयारी पूर्ण

file photo
file photo

नागपूर  : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्‍यक तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा निवडणुकीचा आढावा जिल्हाधिकारी मुद्‌गल यांनी आज घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुद्रांक शुल्क विभागाचे सह संचालक प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, निशिकांत सुके, शिरीष पांडे, तसेच विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करताना अर्जासोबत आवश्‍यक कागदपत्रासंदर्भात पूर्वसूचना देण्यासोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चार ऑक्‍टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची सुविधा विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात यावी. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मुद्‌गल यांनी दिल्या. निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेंबरला प्रसिद्ध होत असून, नामनिर्देशन पत्र चार ऑक्‍टोबर रोजी दुपारी तीनपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. छाननी 5 ऑक्‍टोबर रोजी होईल, त्यानंतर 7 ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 21 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com