नोटाबंदीने शेतकऱ्यांचे हाल सुरूच - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

सेवाग्राम (जि. वर्धा) - केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरीविरोधी धोरण राबविले जात असून नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. सेवाग्राम आश्रमातील बापूकुटीचे दर्शन घेतल्यानंतर ते शुक्रवारी (ता. सहा) पत्रकारांशी बोलत होते.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी जाब विचारण्याकरिता काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता. सहा) प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली होती.

खासदार अशोक चव्हाण म्हणाले, पालिका निवडणुकीत काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले. ही पडझड नसून येणाऱ्या काळातील परिवर्तनाची नांदी आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते निर्णय घेतील. त्यामध्ये राज्यकमिटी हस्तक्षेप करणार नाही. नोटाबंदीमुळे देशाच्या तिजोरीत किती काळा पैसा जमा झाला, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, आमदार रणजित कांबळे, प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडधे, सचिव शेखर शेंडे, अतुल कोटेचा, रवींद्र दरेकर, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, शहराध्यक्ष राजेंद्र शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष इक्राम हुसैन यांच्यासह हजारो काँग्रेसजन सहभागी झाले होते.

Web Title: recent farmers by currency ban