मंदीने वाहन खरेदीला ब्रेक

File photo
File photo

अमरावती : ऐरवी दसरा, नवरात्रोत्सवात दुचाकी तथा चारचाकी वाहन खरेदीची चांगलीच धूम राहते. मागील वर्षीपर्यंत हा टेम्पो कायम होता. परंतु यंदा देशभरातील मंदीचा फटका वाहन खरेदीला देखील बसला आहे. दसरा सण अवघ्या दोन दिवसांवर असताना रविवारी (ता. सहा) प्रतिष्ठान चालकांनी शोरूम खुले करूनही बोटांवर मोजण्याइतकी गर्दी दुकानांमध्ये बघायला मिळाली. सेल्समन, एजंट तथा निरनिराळ्या खासगी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी शोरूमध्ये टाइमपास करतानाचे चित्र होते.
मंदीचे सावट वाहन खरेदीवर घोंघावत असल्याने यंदा वाहनांची विक्री कमालीची घसरली आहे. विशेष म्हणजे, गाड्यांच्या किंमती कमी झाल्यावरही मंदीची लाट मात्र काही कमी झालेली नाही. दरवर्षीच गणेशचतुर्थी, दसरा, घटस्थापना तथा दीपावलीच्या शुभमुहूर्तावर वाहन विक्रेत्यांची चांदीच चांदी राहते. यंदा मंदीचा फटका ऑटोमोबाईलला देखील बसल्याने ग्राहकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरविली आहे. मंदीमुळे यंदा वाहनखरेदीला ब्रेक लागल्याने मागील वर्षाच्या तुलनेत वाहन विक्री कमालीची घटली आहे. दरवर्षी या मोसमात 1000-1100 दुचाकी तर 300-400 चारचाकी वाहनांची विक्री शोरूमतर्फे केली जाते. यंदा ही विक्री कमालीची घटली आहे. विशेष म्हणजे, व्यवसाय अर्ध्यावरच आल्याने ऑटोमोबाईल सेक्‍टरमध्ये चिंता पसरली आहे. अमरावती शहरात निरनिराळ्या ऑटोमोबाईल कंपन्यांचे शोरूम कार्यरत आहे. या सर्वच शोरूममध्ये रविवार असूनही शुकशुकाट होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com