वाघाची शिकार आली अंगलट; 3 वर्षे कारावास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

अकाेट- माैजे खिरकुंड येथे वाघाची शिकार करुन त्याच्या अवयवाची विक्री करणे तीन जणांच्या चांगलेच अंगलट आले. शुक्रवारी(ता.१२) अकाेट येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश नि.रा.वानखडे यांनी याप्रकरणातील तीन्ही आराेपींना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिश्रा ठाेठावली आहे.

अकाेट- माैजे खिरकुंड येथे वाघाची शिकार करुन त्याच्या अवयवाची विक्री करणे तीन जणांच्या चांगलेच अंगलट आले. शुक्रवारी(ता.१२) अकाेट येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश नि.रा.वानखडे यांनी याप्रकरणातील तीन्ही आराेपींना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिश्रा ठाेठावली आहे.

या प्रकरणातील आराेपी आरकास यास वाघाच्या शिकार प्रकरणी तीन वर्ष सश्रम कारावास व २२ हजार रुपये दंड, रंजीतसिंग भाटीया यास तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार दंड, ममरु याला तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने आणखी सश्रम कारावास आहे. मिनारबाईच्या विरुद्ध पुरावे सिद्ध न झाल्याने निर्दाेष मुक्तता करण्यात आली.
मनरु याने त्याच्या बयानात आरकास याने वाघाची शिकार करुन अवयव नष्ट केले. वाघाच्या चामडीचा विक्री व्यवहार रंजीतसिंग याच्यासाेबत करताना १५ हजार रुपये मिळाले असे सांगितले. रंजीतसिंगने या वाघाची चामडी सहा लक्ष ५० हजार रुपयांना विकत घेतली असे सांगितले. तसेच चाैकशी दरम्यान वाघाचे हाड रंजीतसिंग याने दाखविले असून हे हाड देहराडून येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले व प्राप्त अहवालानुसार ए.आर.शेख सहा वनसंरक्षक, तत्कालीन जी.व्ही.उमक,वनरक्षक, आर.के.अंभारे, पंच यांच्या साक्षी पुराव्यानंतर तसेच विविध न्यायालयाच्या निकालाच्या आधारावर सर्व आराेपी दाेषी आढळले. याप्रकरणी बचावपक्षाचे वकील आर.बी.कुळकर्णी यांनी तर सरकारतर्फे विशेष वकील एम.सी.जेस्वाणी यांनी माेलाची भूमीका बजावली.
न्यायालयाच्या निर्णयाच्या सुनावणीच्यावेळी सुनील वाकाेडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नरनाळा, तत्कालीन तपास अधिकारी उपस्थित हाेते. पी.सी.लाकरा उपवनसंरक्षक, अकाेट वन्यजीव, उमेश वर्मा उपवनसंरक्षक, भंडारा वनविभाग, विशेष वकील एम.सी.जेस्वाणी व तत्कालीन तपास अधिकाऱ्यांचे काैतुक हाेत आहे.

Web Title: Recoil was hunting the tiger; 3 years imprisonment