प्रीतीकुमारीने फेकला विक्रमी हतोडा

प्रीतीकुमारी
प्रीतीकुमारी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत जोतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या गौरवकुमार व प्रीतीकुमारी यांनी हतोडाफेकीत नव्या विक्रमाची नोंद करून तिसरा दिवस गाजविला. विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत गौरवकुमारने 62.95 मीटर हतोडा फेकून पीएसएसएमच्या (गोंदिया) अमरिंदरसिंगने 2011 मध्ये नोंदविलेला 52.40 मीटरचा विक्रम मोडीत काढला. महिलांच्या हतोडाफेकीत प्रीतीकुमारीने 42.48 मीटरची नोंद करून स्वत:चाच विक्रम इतिहासजमा केला. तिने गतवर्षी सुनीता यादवने नोंदविलेला विक्रम मोडीत काढताना 39.02 मीटरचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता. चक्रपाणी महाविद्यालयाच्या निकिता राऊतने पाच हजार मीटर शर्यत जिंकून स्पर्धेत स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले. पहिल्या दिवशी तिने दहा हजार मीटर प्रकारात बाजी मारली होती. 
निकाल : 400 मीटर अडथळा (पुरुष) : भास्कर अतकरे (वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्था), प्रणय मोरघडे(कला महाविद्यालय, सिहोरा), छगंदयराम भुरे(डॉ. एल. डी. बी. कॉलेज, पवनी). (महिला) : श्‍वेता वसुले (एस. बी. सिटी महाविद्यालय), आंचल तिवारी (सेवादल महिला महाविद्यालय), मयूरी गडेकर (वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्था). पाच हजार मीटर(पुरुष) : मोहित (पीजीटीडी-15 मि.32.33 सेकंद), संदेश शेबे (मुकुंदराज स्वामी कॉलेज, पचखेडी), अमित (तिरपुडे शा. शि. महाविद्यालय). (महिला) : निकिता राऊत (चक्रपाणी महाविद्यालय-17 मि.58.57 सेकंद), मृणाल सराफ (ईश्‍वर देशमुख शा. शि. महाविद्यालय), पूजा कटरे (वाय. एम. सेलू). हतोडाफेक (पुरुष): गौरवकुमार (जोतिबा शा. शि. महाविद्यालय), मोहित राणा (अजित वाडेकर शा. शि. महाविद्यालय), समीर देशमुख (विदर्भ कॉलेज, लाखनी). (महिला) : प्रीतीकुमारी (जोतिबा शा. शि. महाविद्यालय), प्रेमा प्रजापती (जगत कॉलेज, गोरेगाव), प्रतीक्षा नान्हे(नूतन आदर्श कॉलेज, उमरेड).  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com