पोलिस कर्मचाऱ्यांकडून "वसुली'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पोलिस कर्मचाऱ्यांकडून "वसुली'
नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत आहे. आयकार्ड बनविण्याचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. या कंपनीसाठी वसुली करण्यात येत असल्याची माहिती आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांकडून "वसुली'
नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत आहे. आयकार्ड बनविण्याचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. या कंपनीसाठी वसुली करण्यात येत असल्याची माहिती आहे.
प्रत्येक पोलिसांकडे डिजिटल ओळखपत्रे असणे गरजेचे आहे. काही पोलिस कर्मचाऱ्यांकडे फोटो चिकटवलेले व पेनाने लिहिलेले ओळखपत्र आहेत. मात्र, पोलिस आयुक्‍तांना डिजिटल पोलिसिंग करायची आहे. प्रत्येक ठाण्यात आदेश पोहोचल्यानंतर डिजिटल आयकार्ड तयार करण्यासाठी धडपड करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये दोन पोलिस हवालदारांची नेमणूक केली आहे. ते हवालदार प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून 100 रुपये वसूल करीत आहेत. पैसे देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेगळी यादी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांनी भीतीपोटी पैसे देणे सुरू केले आहे.
पोलिस विभागाअंतर्गत होणाऱ्या या "पठाणी' वसुलीला अनेकांचा विरोध आहे. मात्र, वरिष्ठांची नाराजी कोण ओढवून घेणार? या भीतीपोटी "तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार' पोलिस कर्मचारी सहन करीत असल्याची प्रतिक्रिया पोलिस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
कलेक्‍शनसाठी आटापिटा
प्रत्येक पोलिस ठाण्यात जवळपास 125 ते 150 पोलिस कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांचे पैसे एकाचवेळी द्यावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यासाठी पोलिस कर्मचारी आटापिटा करीत आहेत. त्यासाठी वाटेल तो मार्ग स्वीकारण्यात येत असल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली.

Web Title: Recovery from police personnel