विदर्भात आज "रेड अलर्ट'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने तसा अलर्ट दिलेला आहे.

नागपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने तसा अलर्ट दिलेला आहे.
जवळपास पंधरा दिवस विदर्भात धुमाकुळ घातल्यानंतर वरुणराजा पुन्हा सक्रीय होण्याची दाट शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने आणखी तीव्र रुप धारण केले असून, येत्या चोविस तासांत तो मध्य प्रदेशमार्गे विदर्भात धडकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विशेषत: नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. हवामान विभागाने मंगळवारी विदर्भात "रेड अलर्ट' दिला असून, बुधवारीही "ऑरेंज अलर्ट' आहे. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
बहूतांश धरणांमध्ये अल्प जलसाठा
हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे सध्या कोरडेठाक पडलेल्या विदर्भातील धरणांचीही स्थिती सुधारण्याची शक्‍यता आहे. पंधरा दिवस संततधार पाऊस पडूनही इरई (चंद्रपूर) व गोसेखुर्द (भंडारा) या धरणांचा अपवाद वगळता विदर्भातील बहूतांश धरणांमध्ये सध्या अल्प जलसाठा आहे. विशेषत: नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच (तोतलाडोह) धरणाची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. येथील धरणात अजूनही जलसाठा शुन्य आहे. कामठी खैरी व रामटेक येथील धरणांचीही तीच स्थिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: red alert in vidarbha