लाल मिरचीचे भाव झाले तिखट, गृहिणींचे बजेट डाऊन

chilli.
chilli.

वर्धा : साखर मिठा इतकच महत्त्व पदार्थात तिखटाचे असते. उन्हाळ्यात महिला लाल मिरची घेऊन वाळवून कांडून त्याचे तिखट तयार करून वर्षभराची बेगमी करून ठेवतात. यंदा मात्र कोरोनाच्या टाळेबंदीने सारे गणितच बिघडले.
लॉकडाउन शिथिल होताच लाल मिरचीचे भाव कमी होतील, अशी गृहिणींना अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच लॉकडाउन शिथिल होताच व मालवाहतूक सुरू होताच लाल मिरचीच्या भावाचा भडका उडाला आहे. बाजारात 350 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत मिरची विक्रीस उपलब्ध आहे. मिरचीचे भाव कडाडल्याने गृहिणी विचारात पडल्या आहे.
लॉकडाउनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावात 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तर काही वस्तूंचे उत्पादनसुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे काही वस्तूंचे भाव चांगलेच कडाडले आहेत. तिखटाशिवाय जेवणात रंगतच येत नाही. पाच रुपये किलोचे वांगे असो की, पाचशे रुपये किलोचे मटण असो, या दोन्ही भाज्या तयार करण्यासाठी तिखटची गरज आहे. भलेही मसाला कमी असला तरी चालेल. एखाद्या वेळी घरी भाजी शिजली नाही. तर आजही गावखेड्यात चिरलेल्या कांद्यावर  तिखट, टाकून वेळ निभावून नेली जाते. त्यामुळे स्वयंपाक घरात  तिखटचा डब्बा भरूनच असतो. घरी  तिखट, नसल तर गृहिणींची घालमेल सुरू होते.
उन्हाळा लागताच मार्च व एप्रिल महिन्यात गृहिणी वर्षभर पुरेल एवढ्या मिरचीची एकावेळीच खरेदी करतात. यानंतर मिरची वाळवून तिखट तयार करतात. जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मार्च महिन्यातच लॉकडाउन करण्यात आले. परिणामी, मालवाहतूक बंद झाली. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव कडाडले. अनेक व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून लाखो रुपये कमविले. मिरचीचे भावसुद्धा गगनाला भिडले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर भाव कमी होतील, अशी गृहिणींना अपेक्षा होती. त्यामुळे गृहिणींनी मिरची खरेदी केली नाही. तोपर्यंत रेडिमेड मिरची पावडर विकत घेतले. लॉकडाउन शिथिल झाले आहे. मात्र, लाल मिरचीचे भाव पुन्हा पेटले आहे. सध्या बाजारात पटणा 300, भिवापुरी 200, लवंगी 190 आणि गावरानी मिरचीचे भाव 160 रुपये प्रतिकिलो आहे. पाच दहा किलो मिरची खरेदी करण्यासाठी गृहिणींना विचार करावा लागत आहे. आहारात तिखट, आवश्‍यकअसतेच. गृहिणी आपल्या परीने मिरची खरेदी करीत आहे.
दोन ते तीन प्रकारच्या मिरचींची खरेदी
पटणा 300, भिवापुरी 200 आणि गावरान मिरची दीडशे रुपये किलो आहे. त्यामुळे महिला एकाच प्रतीच्या मिरची खरेदी करीत नसून गावरान मिरची अधिक खरेदी करतात. त्यात मिक्‍स करण्यासाठी एखादी किलो भिवापुरी अथवा पटणा मिरची खरेदी करीत असल्याचे व्यावसायिकाने सांगितले.
उत्पादनात घट
मागील वर्षी पडलेल्या अति पावसामुळे मिरची पिकाची नासाडी झाली आहे. वर्धा जिल्ह्यात मिरचीचे उत्पादन कमी घेतले जाते. चंद्रपूर, गडचिरोली, आंध्र आणि तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लावगड केली जाते. यंदा पावसामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. येथील व्यापारी नागपूर मार्केटमधून मिरची विक्रीस आणतात.

सविस्तर वाचा - ...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन
मिरची पावडरचा काळाबाजार
बाजारात दीडशे रुपये किलो मिरची उपलब्ध आहे. तर मिरची पावडर दीडशे ते दोनशे रुपये किलो सहज मिळते. मिरची घेतल्यानंतर त्यात तूट येत असून कांडपचा खर्चही आहे. दोनशे रुपये किलो मिरची पावडर घरातच पडते. असे असतानाही फेरीवाले 200 रुपये किलोने मिरची पावडर विक्री करतात. मिरचीच्या काचोळ्यासुद्धा काढल्या जात नाही. तशाच मिरच्या बारीक केल्या जातात. मिरची पावडरमध्ये लाल रंग मिसळला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com