तांत्रिक बिघाडाच्या ठिकाणी होणार फेरपरीक्षा

file photo
file photo

अमरावती : वनरक्षक व वनसर्व्हेक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत यवतमाळ व पुणे येथील एका केंद्रावर तांत्रिक अडचणी आल्याने आता तेथील विद्यार्थ्यांची परीक्षा 25 जून रोजी घेतल्या जाणार आहे.
महापरीक्षा या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यापासून तर परीक्षाकेंद्राची निवड करणे, प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करणे, त्यानंतर निकाल जाहीर करण्यापर्यंतची कार्यवाही पूर्णत: परीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होत आहे. 9 ते 22 जून 2019 पर्यंत झालेल्या परीक्षेत 3 लाख 82 हजार 951 उमेदवारांपैकी 2 लाख 46 हजार 606 उमेदवार हजर होते.
9 व 10 जून रोजी यवतमाळ येथील डॉ. भाऊसाहेब नांदूरकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेत व पुणे येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परीक्षा होऊ शकली नाही. या परीक्षा नव्याने घेण्यात येतील, अशा सूचना महापरीक्षा संकेतस्थळावर तसेच परीक्षास्थळावर प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. रद्द झालेल्या परीक्षा 25 जून 2019 रोजी यवतमाळ येथील डॉ. भाऊसाहेब नांदूरकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मार्केंडेय पब्लिक स्कूल व पुणे येथे अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेत आयोजित करण्यात आली आहे, त्यासंदर्भात संबंधित उमेदवारांना सूचना, नवीन प्रवेशपत्र पाठविण्यात आले आहे, असे विभागीय वनाधिकारी एच. एस. वाघमोडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com