भयंकर! दोन लाख रुपये, दुचाकीसाठी भावी वराचा लग्नास नकार

संतोष ताकपिरे
Friday, 11 December 2020

मुलीचे जुळलेले लग्न तुटू नये म्हणून त्यांनी भावी वरासह त्याच्या निकटवर्तीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन लाख रुपये व नवीन दुचाकी मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही, या भूमिकेवर भावी नवरदेव व त्याचे निकटवर्तीय ठाम राहिले.

अमरावती : लग्न जुळल्यानंतर वधूपक्ष आनंदित होता. परंतु, ऐनवेळी वरपक्षाने दोन लाख व सोबतच एक दुचाकीची मागणी करून लग्न मोडल्याने वधूपक्षापुढे मोठा पेच निर्माण झाला. धारणी पोलिसांनी याप्रकरणी वरपक्षाकडील चौघांविरुद्ध हुंडाबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

धारणी ठाण्याच्या हद्दीत बिबामल गावातील एका व्यक्तीच्या मुलीचे लग्न एका युवकासोबत जुळले होते. वधूपक्षाने लग्नाची तयारी आपल्या परिने सुरू केली. परंतु, वरपक्षाकडील मंडळींनी ऐनवेळी वधूपित्याकडे दोन लाख रुपये व एक नवीन दुचाकीची मागणी रेटून धरली. ऐनवेळी केलेल्या मागणीमुळे वधूकडील मंडळी अडचणीत आली.

मुलीचे जुळलेले लग्न तुटू नये म्हणून त्यांनी भावी वरासह त्याच्या निकटवर्तीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन लाख रुपये व नवीन दुचाकी मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही, या भूमिकेवर भावी नवरदेव व त्याचे निकटवर्तीय ठाम राहिले.

हेही वाचा - श्रीमंतांचा खाऊ रस्त्यावर; उपराजधानीत ठिकठिकाणी होतेय काजू-बदामची विक्री

त्यामुळे वधूपित्याने अखेर धारणी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भावी वरासह एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारपर्यंत त्याप्रकरणी कुणाला अटक झाली नसल्याचे धारणी पोलिसांनी सांगितले. 

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Refusal of marriage given by future groom for dowry

Tags
टॉपिकस
Topic Tags: