नातेवाईकांना मारावा लागला रुग्णवाहिकेला धक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

वरोरा (जि. चंद्रपूर) : रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सुसज्ज अशा रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील एका रुग्णास तातडीने उपचाराकरिता चंद्रपूरला 108 या रुग्णवाहिकेने पाठविताना ती बंद पडली. त्यामुळे रुग्णांच्या आप्तेष्ठांना धक्‍का मारून रुग्णवाहिका सुरू करावी लागली. त्यानंतर रुग्णवाहिका चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाली.

गंभीर जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे, याकरिता महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिका मागील काही वर्षांपासून सेवेत आहे. या रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकाऱ्यासमवेत सज्ज असतात. रुग्णवाहिका बोलविण्याकरिता 108 क्रमांकाचा टोल फ्री क्रमांक आहे. तो डायल केल्यास रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होते. वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन रुग्णवाहिका आहे. काही दिवसांपूर्वी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ एका रुग्णाला दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले. रुग्णांच्या आप्तेष्टांनी 108 क्रमांकावर कॉल केला. रुग्णवाहिका चालकास यंत्रणेमार्फत माहिती मिळाली. तातडीने रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयात आली. त्यानंतर रुग्णाला आत ठेवण्यात आले. त्यानंतर चालक रुग्णवाहिका घेऊन निघाला. मात्र, रुग्णवाहिका चालूच होत नव्हती. त्याने बरेच प्रयत्न केले. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी नातेवाईकांनी धक्का मारून रुग्णवाहिका सुरू केली. रुग्णवाहिका सुरू झाल्यानंतर ती चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The relative had to hit the ambulance