नातेवाइकांना धक्काबुक्की

file photo
file photo

अमरावती: विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात माहेरच्यांनी आक्षेप घेतल्याने मध्यस्थी करण्यासाठी इर्विन रुग्णालयात गेलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाने इर्विनमध्ये काही काळ तणाव होता. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे रविवारी (ता. 13) दुपारपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया रखडली होती. 
पूनम संजय ठाकरे (वय 30, रा. कौंडण्यपूर), असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन केल्यामुळे पूनम ठाकरे यांना त्यांच्या पतीने इर्विनमध्ये दाखल केले. काही तासांत महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती पती संजय बाबाराव ठाकरे यांनी पत्नीच्या माहेरच्यांना दिली. ज्यावेळी मृत पूनम यांचे नातेवाइक इर्विनमध्ये पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह शवागारात ठेवला होता. माहेरच्यांनी पतीसह सासरच्यांना पूनमच्या मृत्यूची कारणे विचारली असता, त्यांच्यात वादावादी झाली. मृत्यूबाबत नातेवाइकांनी संशय व्यक्त केला. त्याचवेळी एक लोकप्रतिनिधी काही समर्थकांसोबत इर्विनमध्ये दाखल झाले. त्यांनी मृत महिलेच्या माहेरच्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू असताना योगेश बोडनासे यांनी मोबाईलने शूटिंग केली असता, कार्यकर्त्यांनी मोबाईल हिसकावला. एकाचा मोबाईल धक्काबुक्की झाल्याने फुटला. त्यामुळे मृत पूनम हिचे वडील अरुण बापूराव काळे (वय 58, रा. जामगाव, वरुड) यांनी शहर कोतवाली ठाण्यात धक्काबुक्कीप्रकरणी तक्रार नोंदविली. 

मृत महिलेच्या वडिलांनी धक्काबुक्कीप्रकरणी तक्रार नोंदविली. या तक्रारीची चौकशी केल्या जाईल. अद्याप कुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही.
-शिवाजी बचाटे, पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com