टक्‍केवारीचा आग्रह सोडा, रूची ओळखा

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : पालकांनो पाल्यांकडे टक्केवारीचा आग्रह धरू नका, त्यांची बौद्धिक क्षमता व विषयातील रुची ओळखा. अतिरिक्त अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नका. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी प्राप्त केलेल्या यशात समाधान मानून त्यांना प्रोत्साहन द्या. अभ्यासासह आहाराची काळजी घ्या, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती वाघमारे यांनी पालकांना दिला.
सकाळ माध्यम समूहातर्फे मुलांनी परीक्षेच्या काळात आणि वर्षभर आपले आरोग्य कसे जपावे, आहार, परीक्षेचे कसे नियोजन करावे आणि पालकांची काय जबाबदारी असते, एकाग्रता वाढविण्याकरिता कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची या विषयावर पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी "सकाळ फुलू द्या मुलांना' हा कार्यक्रम राणी दुर्गावती चौक, बिनाकी मंगळवारी येथील सेंट एम. बी. कॉन्व्हेंट स्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज येथे घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती वाघमारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक डॉ. धनराज भुते, मुख्याध्यापक डॉ. अनिता भुते, ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वासनिक, दया कटरे, ताजश्री गुलटकर, पर्यवेक्षिका रोमा नंदेश्वर उपस्थित होते.
तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन, सकस आहार, आरोग्याची योग्य काळजी, नियमित अभ्यास व उजवी घेतल्यास निश्‍चित यशाचे शिखर गाठू शकता. डॉ. स्वाती वाघमारे यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना छोटे-छोटे प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. पहिल्या वर्गापासून अभ्यास चांगला केल्यास पाया मजबूत होतो. चुका टाळण्यास मदत होते. तो बळकट करण्यासाठी कोणत्या गोष्टी आत्मसात करायच्या, कोणत्या टाळल्या पाहिजे, हे सांगितले. प्रास्ताविक सकाळचे सहायक वितरण व्यवस्थापक रूपेश मेश्राम यांनी केले. संचालन श्रुती गेडाम यांनी केले. आभार डॉ. अनिता भुते यांनी मानले. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नीलेश राऊत, नीलेश्वर पटले, कोमल भाकरे, चेतन वर्मा, सर्व शिक्षक-शिक्षकांनी सहकार्य केले.

डॉक्‍टरांचा पालकांना व विद्यार्थ्यांना सल्ला
- अभ्यास करताना घरातील वातावरण शांत ठेवा
- पाठांतर केल्यानंतर ते लिहून पाहा
- परीक्षा येईपर्यंत नियमित पाठांतर करा
- टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करा
- पालकांनी मुलांसोबत नियमित संवाद करावा
- नियमित मिनिटे व्यायाम करा आणि खेळा
- जंकफूड घेणे टाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com