कर्जवाटपाचा उच्चांक झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा; ५५ टक्‍क्‍यांचा पल्ला गाठला

Relief to farmers due to high loan disbursement Yavatmal news
Relief to farmers due to high loan disbursement Yavatmal news

अमरावती : यंदाच्या रब्बी हंगामात प्रथमच पीककर्ज वाटपाने उच्चांक गाठला आहे. गेल्या काही वर्षांत इतक्‍या प्रमाणात पीककर्ज दिले गेलेले नाही. यावर्षी ५५ टक्‍क्‍यांचा पल्ला गाठण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात विविध अडचणींवर मात करीत रब्बी हंगामात २३४ कोटी ७० लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

२०२०-२१च्या खरीप हंगामात कर्जवाटपाचा आकडा ६२ टक्‍क्‍यांवर गेला आहे. मात्र, हा हंगाम शेतकऱ्यांना उत्पादनाच्या दृष्टीने फारसा लाभदायक गेला नाही. खरिपातील मूग, उडीद, सायोबीनसह कापसालाही फटका बसला. तुरीवर अपेक्षा होत्या. त्या बाजारात सद्या मिळत असलेल्या वाढत्या भावामुळे काही अंशी पूर्ण होत आहेत. खरिपातील पिके मोडून रब्बीची कास धरणाऱ्या शेतकऱ्यांनी बॅंकांकडे कर्ज मागणी केली.

रब्बी हंगामात यावर्षी प्रथमच कर्ज वाटपाचा उच्चांक गाठला गेला आहे. कर्जवाटपाने ५५ टक्‍क्‍यांचा आकडा पार केला. जिल्ह्यातील २२ हजार ७५९ शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीककर्ज देण्यात आले आहे. या हंगामात ४३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक देण्यात आले होते. त्यापैकी २३४ कोटी ७० लाख रुपयांचे पीककर्ज देण्यात आले.

राष्ट्रीयकृत बॅंकांनी यामध्ये ७९ तर ग्रामीण बॅंकांनी ६१ टक्के वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने रब्बी हंगामात कर्जपुरवठा केलेला नाही. खरीप हंगामातही यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत उच्चांक गाठला आहे. तब्बल ६२ टक्के पीककर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

दोन हंगामात १३०८ कोटी

दोन्ही हंगाम मिळून २०२०-२१ साठी २,१५० कोटींचा लक्षांक निश्‍चित करण्यात आला होता. त्यापैकी १,३०८ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, ते सरासरीने ६१ टक्के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com