कुख्यात गुंड फैजानची काढली धिंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

नागपूर : शहरातील कुख्यात गुंड फैजान खान आणि अजय ठाकूर यांनी साथीदारांसह हातात तलवारी आणि दंडे घेऊन गणेशपेठ परिसरात हैदोस घालत लूटमार केली, तसेच वाहनांची तोडफोड करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी दोघांनाही आज सकाळी अटक केली. पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांनाही पकडून सेवासदन चौकातून धिंड काढली, तसेच नागरिकांना भयमुक्‍त राहण्याचे पोलिसांनी आवाहन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान खान हा एका गॅंगचा म्होरक्‍या असून याच्यावर शहरात अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. लूटमार, खंडणी, दादागिरी, वसुली आणि हप्ता मागण्यासारखे गुन्हे फैजान गॅंगवर आहेत. मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास इजहार हुसेन उर्फ शानू मोहम्मद सलीम (37, रा. हंसापुरी, तहसील) हे त्यांच्या गणेशपेठ हद्दीतील संत्रा मार्केट रेल्वे स्टेशनच्या पूर्वगेट समोरील एन.एम.सी. कॉम्पलेक्‍समधील राजा रेस्टॉरेंट येथे वेटरसह काम करीत होते. यावेळी आरोपी फैजान खान (25, रा. संत्रा मार्केट), मो. शकील, मो. अली (25, रा. बजेरिया), रितिक गौर (25, रा. संत्रा मार्केट), राज काल्या ऊर्फ फैजान खान (28, रा. खदान, तहसील), अजय उर्फ टंटू वल्द कैलास ठाकूर (19, रा. संत्रा मार्केट, नागपूर) व त्यांच्या आणखी एका साथीदाराने संगनमत करून त्यांच्या हॉटेलमध्ये जबरदस्ती घुसून धिंगाणा घातला. यावेळी आरोपी फैजान खानने हातात तलवार घेऊन फिर्यादी इजहार हुसेन यांना अश्‍लील शिवीगाळ करून "मै यहां का डॉन हूं' असे बोलून त्यांच्या हॉटेलच्या गल्ल्यातील नगदी 3 हजार रुपये जबरीने काढले व दुकानातील काचेचे काउंटर, फ्रिज, प्लॅस्टिक टेबल, खुर्ची, पंखे, या सामानाची तोडफोड करून 40 हजारांचे नुकसान केले. तसेच जाताना आरोपींनी सेवासदन चौकात उभ्या असलेल्या काही लोकांच्या वाहनांचीही तोडफोड केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remembrance of the notorious Gund Faizan