विकास ठाकरेंना अध्यक्षपदावरून हटवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर : विकास ठाकरे यांना कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांनी केली. आमदार तसेच कॉंग्रसचे निरीक्षक नसिम खान यांची भेट घेऊन त्यांनी निवेदनही सादर केले.

नागपूर : विकास ठाकरे यांना कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांनी केली. आमदार तसेच कॉंग्रसचे निरीक्षक नसिम खान यांची भेट घेऊन त्यांनी निवेदनही सादर केले.
महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांची नियुक्ती केली होती. कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवला. स्वीकृत सदस्य म्हणून ठाकरे यांना महापालिकेत येण्यापासून रोखण्यासाठी नगरसेवकांमध्ये दोन गट पडले. त्यांनी महाकाळ यांना हटविले. त्याऐवजी तानाजी वनवे यांची नियुक्ती केली होती. हा वाद न्यायालयापर्यंत पोहचला होता. ही फूट अजूनही कायम आहे. दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने अद्याप महापालिकेत अस्थिरतेचे वातावरण आहे. मात्र शहर कॉंग्रेस ठाकरे यांच्याच ताब्यात आहे. त्यांच्या समर्थकांची संख्याही मोठी आहे. ठाकरे यांचा कार्यकाळ संपलेला आहे. मात्र घोळामुळे येथील निवडणूक होल्डवर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे यांचे अध्यक्षपदही कायम आहे. आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. ते ठाकरे गटाला झुकते माप देत असल्याचा आरोप होता. आता प्रदेशाध्यक्ष बदलल्याने ठकरे यांच्या विरोधकांना बळ मिळाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove Vikas Thakre from the post of president