नवजातांच्या मृत्यूनंतर हटविलेले डॉ. खान पूर्वपदावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

चंद्रपूर ः येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष नवजात शिशू केंद्रात 14 महिन्यांत 436 बाळांचा मृत्यूनंतर या केंद्राचेप्रमुख डॉ. एम. जे. खान व डॉ. भास्कर सोनारकर यांची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा डॉ. खान यांना या केंद्राचे प्रमुख करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. नवजात बाळांचे मृत्यू प्रकरण उघडकीस आल्यानंतर डॉ. खान ऐवजी डॉ. मनोज भटनागर यांना नवजात शिशू केंद्राचे प्रमुख करण्यात आले होते. डॉ. खान यांचे खासगी रुग्णालय आहे. त्यांना येथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळ मिळत नाही.

चंद्रपूर ः येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष नवजात शिशू केंद्रात 14 महिन्यांत 436 बाळांचा मृत्यूनंतर या केंद्राचेप्रमुख डॉ. एम. जे. खान व डॉ. भास्कर सोनारकर यांची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा डॉ. खान यांना या केंद्राचे प्रमुख करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. नवजात बाळांचे मृत्यू प्रकरण उघडकीस आल्यानंतर डॉ. खान ऐवजी डॉ. मनोज भटनागर यांना नवजात शिशू केंद्राचे प्रमुख करण्यात आले होते. डॉ. खान यांचे खासगी रुग्णालय आहे. त्यांना येथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे तेव्हा सांगितले गेले. मात्र, महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच पुन्हा डॉ. खान यांच्याकडे विशेष नवजात शिशू केंद्राचे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. खान यांच्या व्यस्ततेमुळे त्यांना पदावरून दूर केल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आता त्यांना वेळ कुठून मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण त्यांची खासगी सेवा सुरूच आहे. सूत्रानुसार, 14 महिन्यांत 436 बाळांचे मृत्यू प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली. तेव्हा प्रकरण शांत करण्यासाठी डॉ. खान आणि सोनेकर यांना पदावरून दूर करण्यात आले होते. आता नवजात बाळांचे मृत्यू विस्मरणात गेल्यानंतर पुन्हा डॉ. खान यांच्याकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Removed Dr. after the death of newborns Khan preceded