कारवाई प्रस्तावित असलेल्या मंडळ अधिकाऱ्याची बदली

कारवाई प्रस्तावित असलेल्या मंडळ अधिकाऱ्याची बदली

बाभूळगाव (जि. अकोला) :  नागरिकांची 19 प्रकरणे प्रलंबित ठेवण्याच्या कारणावरून ज्या मंडळ अधिकाऱ्यावर महसूल विभागाच्या आढावा बैठकीत खुद्द आमदार महोदयांनी कारवाईचा प्रस्ताव ठेवला होता. त्या मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई होण्यापूर्वीच त्याच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे ही बदली म्हणजे आमदारावर कुरघोडीचा प्रयत्न तर नाही ना. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर तसे असेल तर ही कुरघोडी कोणी केली असावी, याबाबत विविध तर्क-वितर्क लावल्या जात आहेत.


महत्त्वाची बातमी - शेतकऱ्याचा खून; मृतदेह आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेत
कारवाई होण्याआधीच बदली

गेली काही दिवसांपूर्वी पातूरच्या तहसील कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सस्तीचे मंडळ अधिकारी महादेव सरफ यांनी नागरिकांची 19 प्रकरणे प्रलंबित ठेवल्याचे समोर आल्यानंतर या कारणासाठी त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यामुळे आमदारांच्या धडाकेबाज निर्णयाचे नागरिकांमधून कौतुक व्हायला लागले होते. परंतु, कारवाई प्रस्तावित असलेल्या मंडळ अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई होण्यापूर्वीच त्याच्या बदलीचे आदेश निघाले.


अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत
प्राप्त माहितीनुसार एका बड्या नेत्यांच्या गावात बदली झाली असल्याचे समजते. त्यामुळे ही बदली नेमकी कोणत्या कारणाने झाली, प्रशासकीय स्तरावर नियमित पद्धतीने बदली झाली की, मागणीवरून बदली झाली. आमदारांच्या आदेशांना फोल ठरविण्यासाठी व आमदारावर कुरघोडी करण्यासाठी ही बदली कोणी घडवून आणली असे नानाविध तर्कवितर्क या बदलीबाबत लावले जात आहेत. नेमके सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल. दरम्यान, या बदली मागच्या नेमक्या कारणाकडे संपूर्ण तालुका वासियांचे लक्ष लागून आहे.

क्लिक करा - धक्कादायक : एका भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा भावांचा मृत्यू
कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे

मंडळ अधिकारी महादेव सरप यांच्या बदलीचा आदेश आल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे तसेच आढावा बैठकीत आमदार महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांना पाठवलेला आहे.
-दीपक बाजड, तहसीलदार, पातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com