दिलासादायक : दिल्ली रिटर्न चौघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह

Coronavirus test negative.jpg
Coronavirus test negative.jpg

जळगाव जा. (जि.बुलडाणा) : स्थानिक राणीपार्क निवासी दोन महिला, दोन पुरुष ह्यांना बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी 3 एप्रिल रोजी नागपूर येथे प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 

बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले चौघे पण घरी पोहोचले आहेत. हे चारही जण दिल्ली गेले होते. परंतु त्यांचा मरकजमध्ये सहभाग नव्हता, मात्र त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. ह्या गोष्टीला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. म्हणून कोणतीही रिस्क न घेता त्यांना बुलडाणा येथे पाठविण्यात आले होते.

अनर्थ टळला!
3 एप्रिलला ह्या चौघांना बुलडाणा येथे पाठविण्यात आल्यापासून शहरात अनेक तर्क-वितरकांना उधाण आले होते. ह्या चारही जणांच्या संपर्कात आलेल्यांचे पण धाबे दणाणले होते. तसेही ते दिल्लीहून परत येऊन सतरा ते अठरा दिवस झाले होते. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे पण दिसत नव्हती. सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जळगाव वासीयांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

प्रशासनाचा ताण हलका झाला
अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा ताण सुद्धा हलका झाल्याचे ठाणेदार सुनील जाधव यांनी सांगितले. पोलिस आणि आरोग्य विभाग डोळ्यात तेल घालून अहोरात्र आपली सेवा सपरपित करीत आहेत. नागरिकांनी काम नसतांना बाहेर फिरू नये, सोशल डिस्टन्सची मर्यादा पाळवू प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पण पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com