बियाण्यांचा अहवाल अडकला नागपुरात

चेतन देशमुख
सोमवार, 15 जुलै 2019

यवतमाळ : बोगस खत, कीटकनाशकांसह बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाकडून खरीप हंगामाच्या सुरुवातीला बियाण्यांचे नमुने घेतले जातात. बियाण्यांचे नमुने नागपूर, तर कीटकनाशक व खतांचे नमुने अमरावती येथे पाठविले जातात. यंदा 450 बियाण्यांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले. त्यातील 150 नमुन्यांचे "रिझल्ट' आलेले आहेत. त्यात तीन नमुने "फेल' आढळून आले असून, कृषी विभागाने जप्त केलेल्या "एचटी'च्या 13 व्हरायटी फेल ठरलेल्या आहेत.

खरीप हंगामात यंदा जवळपास साडेनऊ लाख हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत बी-बियाणे, खते व कीटकनाशकांचे नियोजन केले जाते. हंगामाच्या सुरुवातीला कृषी केंद्रात तपासणी करून आलेल्या सर्व बियाण्यांचे नमुने घेतले जातात. गुलाबी बोंडअळी आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच तपासणी मोहिमेचा समावेश आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी दाखल झालेल्या बियाण्यांची तपासणी करण्यासाठी नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात. यंदा जिल्हा कृषी विकास अधिकारी, कृषी अधीक्षक कार्यालयाच्या 47 निरीक्षकांनी जिल्ह्यात बियाण्यांचे 450 नमुने घेतले. याशिवाय कृषी विभागाने कृषी केंद्राबाहेर विकले जाणारे वेगवेगळ्या व्हरायटीचे तब्बल 450 पाकिटे जप्त केले. हेच नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. कृषी विभागाला त्यातील 150 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यातील तीन कंपन्यांचे नमुने फेल ठरलेले आहेत. त्यांची उगवणक्षमता कमी आढळून आलेली आहे. विशेष म्हणजे अधिकृत नसलेले "एचटी' बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील 13 व्हरायटीचे नमुने फेल ठरले आहेत. कृषी विभागाने जप्त केलेल्या या पाकिटांमुळे अनेक शेतकरी नुकसान होण्यापासून बचावले असले तरी अनेक नमुन्यांचा अहवाल नागपुरात अडकला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report of Seeds is in Nagpur