गणराज्यदिनानिमित्त रेल्वेची विशेष भेट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागपूर - गणराज्यदिन आणि त्यापाठोपाठ विकएंड येत असल्याने अनेकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. यामुळे रेल्वेगाड्या फुल्ल होत आहेत. प्रवाशांची निकड लक्षात घेऊन सुट्या "जॉयफूल' होण्याच्या दृष्टीने गोवा, कोकण, मुंबईसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 

नागपूर - गणराज्यदिन आणि त्यापाठोपाठ विकएंड येत असल्याने अनेकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. यामुळे रेल्वेगाड्या फुल्ल होत आहेत. प्रवाशांची निकड लक्षात घेऊन सुट्या "जॉयफूल' होण्याच्या दृष्टीने गोवा, कोकण, मुंबईसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 

गाडी क्रमांक 01083 नागपूर-मडगाव विशेष ट्रेन गणराज्यदिनी (ता. 26) दुपारी 1.50 वाजता नागपूरहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 2.45 वाजता मडगावला पोहोचेल. 01084 मडगाव-नागपूर स्पेशल ट्रेन त्याच दिवशी सकाळी 10.40 वाजता मडगावहून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता या गाडीचे नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन होईल. या गाडीला सेकंड एसीचा एक, थर्ड एसीचे तीन, स्लीपरचे चार आणि तीन जनरल डबे राहतील. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधदुर्ग, सावंतवाडी रोड, थिवीम येथे थांबे देण्यात आले आहेत. 

मुंबई-नागपूरदरम्यानही विशेष ट्रेन चालविण्यात येत आहे. गाडी क्रमांक 01011 मुंबई-नागपूर विशेष ट्रेन 25 जानेवारीला रात्री 10.20 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनल्सहून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला एक टू टायर एसी, आठ थ्री टायर एसी, 4 स्लीपर कोच आणि तीन सामान्य डबे राहतील. याचप्रमाणे गाडी क्रमांक 01041 नागपूर-मुंबई विशेष ट्रेन 28 जानेवारीला रात्री 10.20 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनल्सवरून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. हीच गाडी 29 जानेवारीला दुपारी 1.50 वाजता नागपूर स्थानकावरून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.15 वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीला एसी सेकंडचा एक, थर्ड एसीचे आठ, स्लीपरचे 4 आणि जनरलचे तीन डबे राहतील. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाड्यांच्या आरक्षित तिकिटांची विक्री सुरू झाली आहे.

Web Title: Republic Day special train