अखेर महिलेवर हल्ला करणाऱ्या वाघिणीला वन विभागाने केले जेरबंद

Rescue Tigress in Yavatmal District
Rescue Tigress in Yavatmal District

नागपूर​ :  यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात अधिवासाच्या शोधात निघालेल्या (टी २ सी १) या वाघिणीला आज वन विभागाच्या पथकाने पकडली. अंधारवाडी येथील शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करून ठार केल्यानंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वन विभागाने तातडीने पावले उचलीत वाघिणीला पकडण्यात आले आहे. वाघिणीला सुरक्षित रित्या ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विशेष लक्ष्य ठेवून होते. 
 

टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढली आहे. या अभयारण्याच्या सभोवलात अनेक गावे असून वाढलेली वाघ अधिवास शोधण्यासाठी भंटकती करतात. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्याने अनेक भ्रमण मार्ग खंडीत झालेले आहेत. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढू लागले आहेत. १९ सप्टेंबरला अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई दडांजे या शेतात काम करणाऱ्या महिलेचा वाघिणीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. यापूर्वी शेतात काम करणाऱ्या सुभाष कायतवार याचा वाघिणीने पाठलाग केला. प्रसंगवधान ओळखून झाडावर चढल्याने त्याचा जीव वाचला. विठोबा वगारहांडे या शेतकऱ्यावरही असाच प्रसंग आला होता. 

मोठी बातमी : एटीएम हॅकर्सच्या टोळ्या सक्रिय, विमानाने येतात; बॅंकांना चुना लावून जातात

या वाघिणीने अंधारवाडी, पाटणबोरी, वाऱ्हा परिसरात पशुधनावर हल्ला करून शिकार केली आहे. टिपेश्‍वर परिसरात वाघ व मानव असा संघर्ष नेहमीच निर्माण होत आहे. हा संघर्ष टाळून वाघांचा नागरी वस्तीत प्रवेश होऊ नये, वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्याने निर्देशानुसार वन्यजीव प्रमुखांनी वाघिणीला ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार वाघिणीला पकडण्यासाठी रॅपिड रेस्क्‍यू टीम व विशेष व्याघ्रसंरक्षण दल वाहनासह तैनात करण्यात आले आहे. नागपूर येथील गोरेवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com