मटका, जुगार विरोधात आक्रोश

file photo
file photo

यवतमाळ : शहरातील विविध भागात जुगार, मटका काऊंटर, दारूविक्री अशा अवैध धंद्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. पोलिस कारवाई करीत नसल्याने संतप्त नागरिकांनी कुठे-कुठे अवैध धंदे सुरू आहेत, याची कुंडलीच पोलिस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे.
शहरात चेन लिफ्टिंग, मोबाईल चोरी, हाणामारीच्या घटनांना आळा घालण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. चौकाचौकात सुरू असलेले मटका अड्डे व दारू विक्रीमुळे सामान्य नागरिक जेरीस आले आहेत. अवैध धंद्यांवर पोलिस अधीक्षकांचा अंकुश राहिला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. आठवडीबाजार, अप्सरा टॉकीज, शारदा चौक, कळंब चौक, रेल्वे स्टेशन, अशोकनगर, तायडेनगर आदी परिसरात खुलेआम मटका अड्डे सुरू आहेत. ग्रामीण भागातून कामाच्या शोधात आलेला मजूरवर्ग मटका-जुगाराच्या आहारी जात आहे. सामान्य जनतेला मटका अड्डे दिसत असताना खाकी वर्दीतील रक्षकांनी डोळ्यावर पट्टी बांधली काय, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

तायडेनगरवासी आंदोलनाच्या पवित्र्यात
तायडेनगर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून अवैध दारू, मटका, गांजा, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध व्यावसायिकांना स्थानिकांनी व्यवसाय बंद करण्याची मागणी केली. उलट नागरिकांवरच दादागिरी करीत धमकाविण्यात आले. चमेडीया-ले-आउट, ताजबाग, बाबा-ले-आउट, फैजनगर या भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अवैध धंदे तत्काळ बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शहर ठाणेदारांना निवेदनातून देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com