सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर आरक्षण

supreme court
supreme court

अकोला ः जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या साेमवारी (ता. 11) प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 8 लाख 44 हजार 190 मतदार निश्चित करण्यात आले आहेत. असे असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप सर्वाेच्च न्यायालयाने अंतिम निर्णय न दिल्याने निवडणुकीच्या 20 नाेव्हेंबरराेजी हाेणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसह इतर निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणजे मतदार याद्या तयार करणे होय. हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने 30 आॅक्टाेबरराेजी जाहीर केला हाेता. या कार्यक्रमानुसार 2 नोव्हेंबरपासून याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. याद्यांवर 2 ते 6 नाेव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यावर अंतिम शिक्कामाेर्तब झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 53 गटांसह पंचायत समित्यांच्या 106 गणांसाठी 8 लाख 44 हजार 190 मतदार निश्चित करण्यात आले आहेत.

20 नाेव्हेंबरराेजी पुन्हा सुनावणी
अकोला जिल्हा परिषदची मुदत डिसेंबर 2018 मध्ये संपली. त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक हाेत असल्याने त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सदर बाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे.

याचिकाकर्त्यांने ठाेकले निवडणूक आयाेगाचे दार!
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च व सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे विकास गवळी यांनी निवडणूक आयोगाला साेमवारी (ता.11) पत्र पाठवून निकालाबाबत मत स्पष्ट करण्याची विनंती केली आहे. जुन्याच कायद्यानुसार निवडणुका घेतल्या तर, पूर्वीचे आरक्षण कायम राहणार. त्यामुळे 50 टक्‍क्‍यांच्यावर गेलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करणारे होणार की नाही. तसेच जुन्या कायद्यानुसार निवडणुका झाल्यातर नवीन कायद्याचे प्रयोजन काय? असा प्रश्‍न उपस्थित करून 50 टक्‍क्‍यांच्यावर आरक्षण जाणार नाही, याची दक्षता घेऊन कारवाई करावी, अशी विनंती या पत्रात केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com