महापौरपद राखीव, तरीही महिलांचाच निरुत्साह 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - नागपूरच्या महापौरपदाची धुरा यावेळी महिलेकडे आहे. मतदानापूर्वीच शहराचे महापौरपद महिलेसाठी राखीव झाले. तरीही काल झालेल्या मतदानात महिलांच्या निरुत्साहामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

नागपूर - नागपूरच्या महापौरपदाची धुरा यावेळी महिलेकडे आहे. मतदानापूर्वीच शहराचे महापौरपद महिलेसाठी राखीव झाले. तरीही काल झालेल्या मतदानात महिलांच्या निरुत्साहामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

मंगळवारी शहरात 2,783 मतदान केंद्रांवर पार पडले. शहरात एकूण 20 लाख 93 हजार 392 मतदार आहेत. यापैकी 10 लाख 22 हजार 401 महिला मतदार आहेत. काल एकूण 11 लाख 24 हजार 631 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 5 लाख 90 हजार 273 पुरुषांचा समावेश आहे. 5 लाख 34 हजार 358 महिलांनी मतदान केले. महिलांच्या मतदानाची संख्या पुरुषांच्या तुलनेत 55 हजार 915 कमी आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी महिलांच्या घटलेल्या टक्केवारीची चांगलीच चर्चा दिसून आली. महापालिकेची धुरा महिलेकडे देण्यात आल्यानंतर महिला मतदानात आघाडी घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांची बरोबरी करीत आहे. किंबहुना शिक्षणात दरवर्षी मुलींचाच टक्का अधिक असतो. अनेक क्षेत्रांत महिला आघाडीवर राहून यशस्वीपणे नेतृत्व करीत आहेत. परंतु मतदानात महिलांची टक्केवारी कमी का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकारणात नको त्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे महिलांनी मतदानाला जाणे नाकारले असावे, असा एक अंदाज काढण्यात येत आहे. नुकतेच भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी अश्‍लाघ्य उद्‌गार काढले. त्यामुळे त्यांच्याविरोधात संतापाची लाट आहे. त्याचा फटकाही महिला मतदानाच्या टक्केवारीला बसला असावा, अशीही चर्चा यानिमित्त सुरू झाली आहे. 

Web Title: Reserved for mayor